शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दुचाकी चोरट्यांची धूम... आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:23 IST

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात पोलीस व्यस्त असल्याचे पाहून दुचाकी चोरटे सक्रिय झाले.

ठळक मुद्देशहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात पोलीस व्यस्त असल्याचे पाहून दुचाकी चोरटे सक्रिय झाले. शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.

किरकोळ कारणावरून ११ आणि १२ मे रोजी शहरात दोन समुदायात दंगल झाली. या दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलीस रात्रं-दिवस काम करीत आहेत. याचाच फायदा घेऊन दुचाकी चोरटे शहरात सक्रिय झाले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध भागांतून आठ दिवसांत २२ दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सिडको एन-१ येथील रहिवासी सचिन धर्मापुरीकर यांनी त्यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवार, दि.२४ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी सचिन यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

दुसरी घटना २५ मे रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहादरम्याान महावीर पंप चौक परिसरातील अलक नंदा कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभी केलेली  मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीडब्ल्यू ००६४) चोरट्यांनी पळविली. याविषयी केतन शिवाजी पाटील यांनी क्रांतीचौकठाण्यात तक्रार नोंदविली. सिल्क मिल कॉलनीतून २२ मे रोजी दुपारी अंकुश प्रकाश श्रीखंडे यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीसी ४३३०) तर आकाशवाणी वाहतूक सिग्नलजवळून ओमप्रकाश जांगीड यांची मोटारसायकल (एमएच-२० डीएक्स ७८३४) १० मे रोजी चोरट्यांनी लंपास केली. उस्मानपुरा येथे २२ मे रोजी रात्री अभिजित बनसोडे यांची मोटारसायकल (एमएच-२० बीजी १४३४) चोरट्यांनी चोरून नेली. तर संजयनगर मुकुंदवाडी येथे २३ रोजी चोरट्यांनी रात्री नवनाथ उघडे यांच्या घरासमोरून मोटारसायकल (एमएच-२० ईपी १२२५) पळविली.

मुकुंदवाडीतील लघुवेतन कॉलनीतून केशव वामन नवल यांची मोटारसायकल (एमएच-२१ बीई ९१२२) २४ मे रोजी रात्री चोरट्यांनी पळविली. पुंडलिकनगर येथे घरासमोर उभी केलेली भैरवनाथ नाथजोगी यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. तर वाळूजमधील मोहटादेवी मंदिराजवळून चोरट्यांनी दिलीप वानखेडे यांची मोटारसायकल २१ मे रोजी लंपास केली. प्रोझोन मॉलसमोर भानुदास उत्तमराव इंगळे यांची उभी केलेली  मोपेड (एमएच- ३१ ईसी ३४२८) चोरट्यांनी चोरून नेली. एपीआय कॉर्नर येथील एका हॉॅटेलजवळ उभी केलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० डीएल २५६०) चोरट्यांनी पळविली. याप्रकरणी आकाश वाहुळे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. सातारा परिसरातील राजकुमार देशमुख यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीझेड ३४३८) ६ मे रोजी चोरीला गेली. रहिमपूर फाटा येथून गणेश आंधळे यांची मोटारसायकल २३ मे रोजी चोरट्यांनी पळविली. याविषयी आंधळे यांनी वाळूज ठाण्यात तक्रार नोंदविली. काचीवाडा येथील अंकुश दगडूजी ढाकणे यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० बीके १३३५) २४ मे रोजी चोरट्यांनी क्रांतीचौक परिसरातून चोरून नेली. ढाकणे यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

पानदरिबा येथील कापड दुकानासमोर सुनील संचेती यांनी त्यांची मोपेड (क्रमांक एमएच-२० ईटी २४१२) उभी के ली होती. ही दुचाकी चोरट्यांनी २५ मे रोजी रात्री चोरून नेली. सुनील यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. नारेगाव येथून चोरट्यांनी आमेर खान बाबर खान यांची तर केम्ब्रिज चौकाजवळून शेख कलीम शेख सुजात यांची मोटारसायकल चोरून नेली. बजाजनगर येथून अरुण यादव यांची दुचाकी चोरून नेली.  शासकीय आयटीआय येथून रवींद्र गोरखनाथ म्हस्के यांची मोटारसायकल १९ मे रोजी चोरीला गेली. तर सिडकोतील सौभाग्य चौकातून आतिश खंबाट यांची मोटारसायकल १२ मे रोजी तर शेख यासर यांची कार ११ मे रोजी सिडको एन-६ येथून चोरट्यांनी पळविली. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtwo wheelerटू व्हीलरtheftचोरी