शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

देशव्यापी ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगरचे दोन अभियंते अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:50 IST

तामिळनाडू पोलिसांच्या तपासात आश्चर्यकारक बाब निष्पन्न; छत्रपती संभाजीनगरजवळील वडगाव कोल्हाटीचे तरुण ‘डिजिटल अरेस्ट’च्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी

छत्रपती संभाजीनगर : देशभरात चर्चेत असेल्या डिजिटल अरेस्ट या सायबर क्राइमच्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये शहरातीलच दोन मुले सहभागी असल्याची धक्कादायक बाब तामिळनाडू पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. श्रीकांत सुरेशराव गाडेकर (३४, रा. वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर), नरेश कल्याणराव शिंदे (२६, रा. आर्यन सिटी, तिसगाव चौफुली, वाळूज) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही अभियंते असून गेल्या अनेक दिवसांपासून ते दिवसभर देवळाई परिसरात हॉटेलमध्ये खोली बुक करून ऑनलाइन फसवणुकीचे टार्गेट पूर्ण करत होते.

तामिळनाडूतील चेन्नईच्या, तिरूवनचेरीत राहणाऱ्या प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी यांना दिल्ली सायबर पोलिस असल्याचे भासवून कॉल करण्यात आला होता. बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंगद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये अडकवले. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी २७ लाख २४ हजार ९०० उकळण्यात आले होते. या प्रकरणी तामिळनाडूचे तिरूवनचेरी (तांबरम शहर) पोलिस तपास करत होते. तांत्रिक तपास करत असताना तामिळनाडू पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले. पोलिस निरीक्षक व्ही. के. सशिकुमार हे २९ जुलै रोजी पथकासह शहरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन त्यांनी सहकाऱ्याची विनंती केली होती. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक निरीक्षक पवन इंगळे, अंमलदार श्रीमंत भालेराव, अशोक वाघ, शिवानंद वनगे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

देवळाईतील हॉटेलपर्यंत पोहोचले पोलिसतामिळनाडू पोलिसांकडे केवळ तांत्रिक पुरावे होते. त्यामुळे आरोपींचा माग काढणे आव्हानात्मक होते. तपासात आरोपी देवळाई चौकातील एका हॉटेलमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तत्काळ पथकाने हाॅटेल गाठत श्रीकांत व नरेशला ताब्यात घेतले. तामिळनाडू सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सातारा पोलिस ठाण्यात नोंद करुन रवाना झाले.

पोलिस विभाग थक्कदेशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाने अब्जावधी रुपयांची लुटमार सुरू आहे. अनेक शहरांच्या पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणांनी यात आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग निष्पन्न केला आहे. मात्र, डिजिटल अरेस्टचे धागेदोरे शहरातील वडगाव कोल्हाटीच्या तरुणांपर्यंत पोहोचल्याचे कळल्यानंतर पोलिस विभाग थक्क झाला आहे.

सेटअपसाठी हॉटेलमध्ये मुक्कामडिजिटल अरेस्टमध्ये फसवणारे पोलिस असल्याचे भासवतात. पोलिसांचा गणवेश, पोलिसांचे दालन, मागे तसा सेटअप करुन व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादित करतात. हा सेटअप उभारण्यासाठीच श्रीकांत व नरेश घर सोडून हॉटेलमध्ये मुक्कामी राहत होते. दोघेही डिजिटल अरेस्टच्या मोठ्या रॅकेटशी जोडले जाऊन टार्गेटनिहाय काम करत असल्याचा संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर