शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांत खळबळ; लाल दिवा दाखवून रेल्वेत लुटारू घुसले, तीन तासांत दोन ठिकाणी धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 19:26 IST

रेल्वेवर दगडफेक करीत रेल्वे डब्यात घुसून लुटले

औरंगाबाद : मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीला पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ लाल दिवा दाखवून थांबवून रेल्वेत घुसलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर शुक्रवारी रात्री १२.५५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देऊनही पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड-मनमाड या पॅसेेंजर रेल्वेला अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. सुमारे १२.५५ वाजेच्या सुमारास पोटूळ रेल्वे स्टेशन येथील ग्रीन सिग्नलला दरोडेखोरांनी कपडा बांधून झाकले. यामुळे केवळ लाल सिग्नल रेल्वे मोटारमनला दिसल्याने स्टेशनजवळच चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबताच धारदार शस्त्रे घेऊन रेल्वेतील एका डब्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनीता सुभाष माचे यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले, तर रतन भास्कर हिवराळे यांचा मोबाईल लुटला. यानंतर अन्य प्रवाशांना धमकावत त्यांचेही मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली. सुमारे दहा मिनिटे धुमाकूळ घालून दरोडेखोर रेल्वेतून बाहेर पडले. हा प्रकार रेल्वेचालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील पोलिसांना कळविली. याप्रकरणी सुनीता सुभाष माचे यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे तपास करीत आहेत.

पावणेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा लूटमारनिडर लुटारूंनी नांदेड-मनमाड या डेमो पॅसेंजर रेल्वेलाही अशाच प्रकारे पोटूळ स्टेशनजवळ लाल सिग्नल दाखवून थांबविले. यानंतर रेल्वेवर दगडफेक करीत रेल्वे डब्यात घुसून लुटल्याची घटना घडली. अवघ्या काही मिनिटांत लूटमार करून ते पसार झाले.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेटया घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस दलाच्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी माहिती जाणून घेतली. रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पगारे, पोलीस निरीक्षक साहेबराव तुपे आणि एल.सी.बी.चे निरीक्षक भाले यांना त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेRobberyचोरी