उस्मानाबाद : उद्योग विकासासाठी जिल्ह्यातील जवळपास २१५६़६ एकर जमीन भूसंपादित करण्यासाठी कौडगाव व इतर पाच ठिकाणी हलचाली सुरू आहेत़ यात कौडगावचा पहिला व तिसरा टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आणि प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत़ दरम्यान, संपादित १४१९़२२५ एकरावर सध्या सुरू असलेल्या मोजक्या उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उस्मानाबादसह कौडगाव, उमरगा, भूम, कळंब या ठिकाणी ५६७़६९ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीसाठी संपादित केले आहे़ जमिनीचे संपादन आणि भूखंड वाटप करून अनेक वर्षाचा कालावधी लोटला तरी उस्मानाबाद शहर वगळता इतरत्र मुलभूत सुविधा अद्यापपर्यंत पुरविण्यात आलेल्या नाहीत़ उस्मानाबाद सारख्या डोंगराळ भागात मुख्यत: पाण्याचा प्रश्न बिकट आहे़ असे असतानाही अनेक उद्योजकांनी एमआयडीसीतील भूखंड घेऊन उद्योग उभारले़ मात्र, रस्ता, विजेसह पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे़ उस्मानाबाद, उमरगा येथे केवळ दोन कूपनलिका असून, उन्हाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ उद्योजकांवर येते़ उद्योजकांनी बैठकांमध्ये मूलभूत सुविधेबाबतचा प्रश्न छेडल्यानंतर उद्योग किती सुरू आहेत ? त्यातून शासनाला किती उत्पन्न मिळेल ? अगोदर उद्योग सुरू होऊ द्या, असे प्रश्न, उत्तरे ऐकावी लागत आहेत़ एमआयडीसीच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी अतिरिक्त कौडगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक दोनसाठी जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे़ तर अतिरिक्त कौडगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक तीन मध्ये ३६९़४३ हेक्टर जमीन संपादनाची कार्यवाही केली आहे़ शिवाय विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी ७८़१२, चोराखळी येथील औद्योगिक क्षेत्रासाठी २४२़५६ हेक्टर, नळदुर्ग एमआयडीसीसाठी २४ हेक्टर, वडगाव सिध्देश्वर औद्योगिक क्षेत्रासाठी १४८़५३ हेक्टर तर तेरखेडा औद्योगिक क्षेत्रासाठी ५५़७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ मात्र, शेतकऱ्यांचा विरोध, न्याय खटले आणि लाल फितीच्या कारभारामुळे ही प्रकरणे रेंगाळली आहेत़शेतकऱ्यांचा विरोधउस्मानाबाद विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण, चोराखळी औद्योगिक क्षेत्र, नळदुर्ग एमआयडीसीतील जमीन संपादन, एकत्रित मोजणीसाठी काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे़ चोराखळी औद्योगिक क्षेत्रातील भूसंपादन प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ वडगाव सिध्देश्वर येथील जमीन संपादनात मावेजाबाबतचा प्रश्न कायम आहे़ तर तेरखेडा येथील भूसंपादनही लालफितीत अडकले आहे़
दोन हजार एकरच्या भूसंपादनाचे प्रयत्न
By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST