शेख नाजेम शेख हाफिज आणि एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. २९ जानेवारी रोजी रात्री रस्त्यावर पाणी टाकल्याच्या वादातून तक्रारदार महिलेच्या बहिणीला आरोपी घरात घुसून मारहाण करीत होते. हे पाहून तक्रारदार या बहिणीला आरोपीच्या तावडीतून सोडविण्यासाठी धावली असता आरोपीनी तिलाही मारहाण करून खाली पाडले आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. या घटनेप्रकरणी महिलेने सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक एम. दासरे तपास करीत आहेत.
=================
मोटरसायकल पळविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : मिलकॉर्नर येथे उभी करून ठेवलेली मोटरसायकल (एमएच २० ईए६०१२)चोरट्यांनी पळविल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली. याविषयी मधुकर किसन बनसोडे (रा. सारा वैभव, जटवाडा रोड) यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
====================
राजनगरात एकाला मारहाण
औरंगाबाद : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या वडिलांनाही तीन आरोपींनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडी परिसरात राजनगर येथे ३१ जानेवारी रोजी रात्री ११:१५ वाजता घडली. गमतीदास व्यंकटी काळे यांनी याविषयी आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. रितेश शिंदे, संदीप शिंदे आणि महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे.
=================
दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण
औरंगाबाद: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आकाश राजेंद्र बनकर (२०,रा. संजयनगर) यांना धीरज केदारे (२१, रा.मुकुंदवाडी) याने धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले. याविषयी आकाशने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली.
======================
अवैध दारू विक्रेत्यावर गुन्हा
औरंगाबाद : चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या सुनील रामभाऊ डुकळे याला मुकुंदवाडी पोलिसांनी ३१जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजता पकडले. त्याच्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविला.