शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडण्यात मराठवाड्यातील दोघांचे योगदान; ‘इस्रो’ कडून होणार सन्मान

By राम शिनगारे | Updated: March 10, 2025 18:00 IST

भारताच्या पहिल्या उपग्रहाचा सुवर्णमहोत्सव : संपूर्ण चमू ‘इस्रो’कडून निमंत्रित

छत्रपती संभाजीनगर : अंतराळाच्या क्षेत्रात अमेरिका-रशियामध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच भारतीय बनावटीचा पहिला आर्यभट्ट हा उपग्रह बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) १९ एप्रिल १९७५ रोजी अवकाशात सोडला. त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त ‘इस्रो’त आर्यभट्ट अवकाशात सोडणाऱ्या चमूच्या सन्मानासाठी सोमवारी (दि. १०) विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. त्यात मराठवाड्यातील दोन शास्त्रज्ञांना ‘इस्रो’कडून आमंत्रित करण्यात आले आहे.

भारताच्या ‘इस्रो’ने विकसित केलेला आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आहे. भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव याला देण्यात आले. याचे प्रक्षेपण रशियाच्या कपुस्टिन यार या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ रोजी कॉसमॉस-३ एम हा उपग्रह वाहक वापरून केले. हा उपग्रह बनविण्यासाठी ‘इस्रो’ने वेगवेगळे चमू बनविले होते. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील शास्त्रज्ञ राजाराम गणगे आणि लातूर जिल्ह्यातील भाऊसाहेब हाके पाटील यांचा समावेश होता. उपग्रहाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू असून, तत्कालीन ‘इस्रो’चे संचालक प्रा. यू. आर. राव यांचा १० मार्च रोजी जन्मदिवस आहे.

सॅटेलाईट डिझाईनिंगवर कामआर्यभट्ट उपग्रह बनविणाऱ्या चमूमधील राजाराम गणगे हे अंबाजोगाई तालुक्यातील वालेवाडी गावचे मूळ रहिवासी. त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९७१ साली इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलीकम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर ‘इस्रो’त शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांनी १९७१ ते १९८३ अशी १३ वर्षे ‘इस्रो’मध्ये काम केले. आर्यभट्ट उपग्रह बनवण्यासाठी स्थापन केलेल्या सॅटेलाईट डिझाइनिंगच्या टीममध्ये सहभागी होते. उपग्रह पाठविण्यासाठी १४०० ते १६०० दरम्यान व्होल्टची ऊर्जा लागते. सोलार पॅनलवरून हाय व्होल्ट मिळण्यासाठी त्यांच्या चमूने काम केले. आर्यभट्टनंतर रोहिणी, भास्कर या उपग्रहावर काम करण्याची संधी मिळाल्याचे गणगे यांनी सांगितले.

सॅटेलाईट कमांड पाठवलीआर्यभट्ट उपग्रह निर्मितीच्या टेलीकमांड ग्रुपमध्ये लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भोकरंबा गावातील शास्त्रज्ञ भाऊसाहेब हाके पाटील यांचा समावेश होता. त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९७३ साली इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलीकम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर ‘इस्रो’त रुजू झाले. त्यांच्या ग्रुपने सॅटेलाईटला कमांड पाठविण्याचे काम केल्याची माहिती हाके पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :isroइस्रोchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरscienceविज्ञानMarathwadaमराठवाडा