लोकमत न्यूज नेटवर्कलासूर स्टेशन : गवळी शिवरा येथील लघु प्रकल्पात बुडून एक मुलगा व एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजता घडली. प्रणाली बाळासाहेब नेटके (११, लासूरगाव) व ज्ञानेश साहेबराव भोसले (१४, रा. वसूसायगाव. ता. गंगापूर) अशी मयतांची नावे आहेत. लासूरगाव येथील प्रणाली बाळासाहेब नेटके ही तिच्या मामाच्या गावी वसूसायगाव येथे आलेली होती. आज दुपारी प्रणाली, ज्ञानेश हे काही मुलांसोबत गवळीशिवरा येथून परत येत होते. याचवेळी ते या प्रकल्पातील पाण्यात पाय धुण्यासाठी गेले असता घसरून पाण्यात पडले. लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
तलावात बुडाल्याने दोन जण गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:51 IST