शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन पॅसेंजर रेल्वे मनमाडपर्यंत न जाता केवळ नगरसोल स्टेशनपर्यंतच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:36 IST

राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरणाखाली बदल

ठळक मुद्देप्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण

औरंगाबाद : मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. प्रवाशांची अनेक महिन्यांची मागणी पूर्ण करताना रेल्वे प्रशासनाने नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर यापुढे फक्त नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

रेल्वे बोर्डाने मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या नांदेडपर्यंतच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी प्रवाशांना नवीन रेल्वे मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत असताना रेल्वेचा अजब निर्णय समोर आला आहे. नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन रेल्वे धावतात. मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरतात. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली या दोन्ही रेल्वे आता केवळ नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर कायम अन्याय केला जात असल्याची ओरड होते. एक रेल्वे देताना दोन रेल्वेच्या सध्याच्या कनेक्टिव्हिटीत घट केली जात आहे. त्यामुळे रेल्वेकडून होणारा अन्याय दिसून येत असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. या दोन्ही रेल्वोंना मनमाडपासून दूर करण्यास विरोध केला जाणार असल्याचे रेल्वे संघटनांनी सांगितले. मनमाड येथे रेल्वेंची अधिक गर्दी असल्याच्या नावाखाली या रेल्वे नगरसोलपर्यंतच राहतील. यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केला जात होता. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणानिमित्त हा प्रयत्न पूर्णत्वास नेला जात असल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मनमाडपर्यंत कायम राहाव्या पॅसेंजरनांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन्ही रेल्वे मनमाडपर्यंत धावल्या पाहिजेत. या रेल्वे केवळ नगरसोलपर्यंत चालविण्यास विरोध केला जाईल, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद