शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कंपनी विक्रीत उद्योजकाची १४ कोटींची फसवणूक करणारे अकोल्यातील धनदांडगे अटकेत 

By सुमित डोळे | Updated: June 29, 2023 20:33 IST

आरोपींनी कंपनी हस्तांतरण करताना महत्त्वाचे व्यवहार, देयके लपवून कोटींची फसवणूक केली.

छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात कंपनी तोट्यात आल्याचे सांगून ७० कोटी रुपयांची कंपनी तिघांनी अवघ्या ४१ कोटीत शहरातील उद्योजकाला विकण्याचा बनाव रचला. त्यानंतर त्यांनाच देयके व इतर बाबी लपवून पैसे उकळत तब्बल १४ कोटी ८२ लाख ६८ हजार रुपयांना फसवले. विशेष म्हणजे, कंपनी विकत घेण्याची तयारी दाखवलेल्या उद्योजकाला फसवून त्यांच्यावर ७० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या अकोल्याच्या धनदांडग्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. नितीन हरिदास पाटील व संदीप हरिभाऊ पुंडकर असे त्यांची नावे असून नितीन हरिदास पाटील हा फरार झाला आहे.

संजय त्रिलोकचंद गोयल (अग्रवाल), रा. एन-१) यांची ऋषी फायबर्स प्रा. लि. कंपनी आहे. यात जिनिंग प्रोसेस तसेच कापसाच्या संबंधीचे व्यवहार चालतात. जानेवारी, २०२१ मध्ये अकोल्याचा एजंट अनिल थानवीच्या मार्फत अकोल्यात लॉकडाऊनमध्ये संकटात आलेली जे. जे. फाईन स्पा कंपनी विकण्यास असल्याचे कळाले. गोयल यांनी मे महिन्यात कंपनीचे संचालक नितीन, संजय व संदीप यांची भेट घेऊन कंपनी ४१ कोटी २५ लाखात हस्तांतरित करण्याचे ठरवले. पाटीलच्या विनंतीवरून गोयल यांनी त्यांना ७ कोटी १४ लाख ५१ हजार रुपये देऊ करत त्यांची ६ कोटी ७२ लाखांचे कर्ज निरंक केले. शिवाय काही देयक देखील दिले. परंतु आरोपींनी कंपनी हस्तांतरण करताना महत्त्वाचे व्यवहार, देयके लपवून कोटींची फसवणूक केली.

उलट गोयल यांच्यावरच गुन्हा दाखलआरोपी अकोला, अमरावतीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बडे प्रस्त आहे. पुंडकरचे भाऊ गेल्या विधानसभेत अवघ्या ३ हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यांनी गोयल यांच्यावरच ७० कोटींच्या फसवणुकीचा आळ घेत गुन्हा दाखल केला. गोयल यांच्या तक्रारीनंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशावरून निरीक्षक गौतम पातारे यांनी यात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, प्रकाश सोनवणे, बापुराव बावस्कर, संतोष गायकवाड, अरविंद पुरी यांच्या पथकाने गुप्तता पाळून तत्काळ रवाना होत दोघांना अटक केली. त्यांना अटक केल्याचे कळताच पाटील मात्र फरार झाला. दोघांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पातारे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद