शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट आधारकार्डआधारे फायनान्स कंपनीकडून खरेदी केले दोन मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:27 IST

बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे फायनान्स कंपनीकडून दोन मोबाईल खरेदी करून २३ हजार ४२२ रुपयांची फसवणूक के ल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

औरंगाबाद : बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे फायनान्स कंपनीकडून दोन मोबाईल खरेदी करून २३ हजार ४२२ रुपयांची फसवणूक के ल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.साजेद खान निसार खान (रा. शहाबाजार, काचीवाडा) आणि शेख रेहान शेख खालीद शेख (रा. शहाबाजार), असे गुन्हा नोंद झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी संगनमत करून जुनाबाजार आणि कॅनॉट प्लेस येथे मोबाईल शॉपीतून दोन मोबाईल खरेदी केले होते. त्यांनी मोबाईल खरेदीसाठी गारखेडा परिसरातील रहिवासी राजेंद्र होनाजी इंगोले यांच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. मोबाईल खरेदीनंतर साजेद आणि रेहान यांनी कर्ज परतफेडीचे केवळ दोनच हप्ते भरले. त्यानंतर त्यांनी हप्ते भरणे बंद केले. ही बाब कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी साजेद आणि रेहान यांनी कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांनी एकाच व्यक्तीच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डमध्ये फेरफार करून कर्ज घेतल्याचे समोर आले. आरोपींनी कट रचून आणि बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून कंपनीची २३ हजार ४३३ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार इंगोले यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी