शिरुर/परळी : शिरुर तालुक्यातील तागडगाव व परळीतील वडार कॉलनी भागातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. या घटना रविवारी उघडकीस आल्या.विकास साहेबराव साबळे (रा. तागडगाव) असे आरोपीचे नाव आहे. गावातीलच १४ वर्षीय मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला त्याने शनिवारी फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी शिरुर ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरुन विकास साबळेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास फौजदार एस. आर. काझी करत आहेत. दुसऱ्या घटनेत परळी शहरातील वडार कॉलनी भागातील १५ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने पळवून नेले. मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी शोधार्थ पथक रवाना केले असून, रविवारी सायंकाळपर्यंत तपास लागला नव्हता. (प्रतिनिधी)
दोन अल्पवयीन मुलींचे रायमोहा, परळीतून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:18 IST