बदनापूर : येथील दुधना नदीच्या पुलाला धडकून दहा वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. अन्य पाच जण जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजेच्या सुमारास परभणीहून औरंगाबादकडे जाणारी नॅनो ( एमएच -२० एजी १८८४) बदनापूर जवळील दुधना नदीच्या पुलावर धडक झालेल्या अपघातात भागवत बळीराम तैनात (१०) हा मुलगा जागीच ठार झाला आणि चालक सोपान रामचंद्र साबळे गंभीर जखमी झाला होता.उपचारादरम्यान साबळे यांचा औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. तसेच बळीराम नारायण तैनात, रूख्मिणी बळीराम तैनात, शारदा बळीराम तैनात, संगीता सोपान साबळे व संगीता यांचा लहान मुलगा (नाव समजू शकले नाही) हे जखमी झाले. याप्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)
अपघातात दोन ठार, पाच जखमी
By admin | Updated: February 5, 2017 00:04 IST