शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत दोन गट भिडले; एमआयएमच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 14:10 IST

जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती आहे

औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक अब्दुल रहीम शेख हनिफ नाईकवाडी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सेंट्रल नाका परिसरात घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी सात जणांच्या विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा सिडको पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

आरोपींमध्ये शेख नासेर शेख सत्तार, शेख निसार शेख सत्तार, अन्सार शेख सत्तार, शेख अर्शद शेख सत्तार, शेख लियाखत शेख सत्तार, शेख सत्तार शेख सरदार आणि गनी पटेल (सर्व रा. चिश्तिया कॉलनी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासेर शेख व नाईकवाडी यांच्यात जमिनीवरून जुना वाद आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका परिसरात दोन गट समोरासमोर आले. हल्ल्यात नाईकवाडी यांच्या डोक्याला मार लागल्याने ते रक्तबंबाळ होऊन कोसळले. नासेर शेख यांच्या गटातीलही काही जण जखमी झाले. ही माहिती समजताच सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार, कृष्णा घायाळ, रमेश राठोड, शिंदे हे फौजफाट्यासह पोहोचले. तोपर्यंत दोन्ही गटांच्या समर्थकांची पांगापांग झाली होती. नाईकवाडी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिडको पोलिसांनी नाईकवाडी यांचे भाऊ शेख तय्यब शेख हनीफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. तपास उपनिरीक्षक अशोक अवचार करीत आहेत.

चार जणांना अटकसिडको पोलिसांनी शेख नासेर, शेख निसार, शेख अन्सार आणि शेख सत्तार या चार जणांना अटक केल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. या दोन्ही गटांत चार महिन्यांपूर्वीही तुंबळ हाणामारी झाली होती. तेव्हा दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या होत्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन