शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये जुगार अड्ड्यांवर धाडी; दोन बुकी अटकेत, सूत्रधार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:34 IST

मटक्याच्या प्रमुख सुत्रधारावर कारवाई केल्याने पैठण शहरात पोलीसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

पैठण : शहरात मटका नावाच्या जुगाराचे जाळे विणून पोलीस कारवाई पासून सातत्याने दूर राहणाऱ्या पैठण शहरातील मटक्याच्या प्रमुख सुत्रधारावर गुरूवारी रात्री पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांच्या दोन बुकींना अटक केल्याने अवैध धंदे करणाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी कारवाई सुरू करताच शहरातील मटका बुकी व सुत्रधार भूमिगत झाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या सुत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

गुरुवारी रात्री पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक छोटुसिंग गिरासे, रामकृष्ण सागडे, मनोज वैद्य, एडके, सोनार, व महिला पोलीसांचा ताफा घेऊन बसस्थानक व पिठुंबरा गल्लीतील मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान मटक्याचे आकडे लिहून घेणारा सोमनाथ गुजाराम सोळुंके रा भिलवाडा व गोकुळ मानसींग भवरे रा. रोहिदास नगर हे दोन बुकी मटक्याच्या साहित्यासह पोलीसांच्या हाती लागले. तर आबेद कासम पठाण व आशिक आयुब पठाण हे सुत्रधार मात्र पोलीसांची चाहूल लागताच फरार झाले.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज वैद्य यांच्या फिर्यादीवरून आयुब मेहबुब पठाण, गोरख भावसिंग लिंबोरे, सोमनाथ गुजाराम सोळुंंके, आबेद कासम पठाण व आशिक आयुब पठाण यांच्याविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कारवाईत नेहमी रोजंदारीवर काम करणाऱ्या बुकीवर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. मात्र गुरूवारी मटक्याच्या प्रमुख सुत्रधारावर कारवाई केल्याने पैठण शहरात पोलीसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार झालेल्या सुत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. प्रसंगी कठोर कारवाई करण्यात येईल असा ईशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे. नागरिकांनी थेट पोलीस निरीक्षक पवार यांना मोबाईल करून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक