शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार

By सुमित डोळे | Updated: May 8, 2024 19:10 IST

लघुशंका आल्याचे नाटक करत दोघे पोलिस ठाण्यातून झाले पसार

छत्रपती संभाजीनगर : तलवार घेऊन दहशत निर्माण करताना रंगेहाथ पकडलेल्या दोन गुंडांना ठाण्यात नेऊन बसवताच त्यांनी हातकडीसह ठाण्यातून पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता ही घटना घडली. विकास दारासिंग जाधव (२३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), सुनिल एकनाथ बेलदार उर्फ जाधव (२३, रा. धाबापिंपरी मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे आरोपींचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके यांनी मंगळवारी रात्री उशिरा छावणी परिसरातून सुनिल व विकास ला शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. पुढील कारवाईसाठी शेळके यांनी दोघांना छावणी पाेलिस ठाण्यात हजर केले. दोघांना शस्त्र, आरोपींच्या कारसह कर्तव्यावर हजर सहायक फौजदार बन्सवाल यांच्या ताब्यात देऊन रितसर नोंद करुन निघून गेले. त्यानंतर बन्सवाल हे सहकारी कर्मचाऱ्यासह गुन्हा दाखल करण्यात व्यस्त असताना आरोपींनी लघुशंका आल्याचे नाटक केले. बन्सवाल यांनी मात्र दोघांची हातकडी काढून कुठल्याही सुरक्षेशिवाय बाथरुमच्या दिशेने पाठवले. दोघांनी मात्र ठाण्याच्या मागील बाजुने तत्काळ हातकडीसह पोबारा केला. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्या तक्रारीवरुन पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद