शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन नगरसेवक पुन्हा निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:47 IST

मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला. यापूर्वी अनेकदा या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला. एकावर तर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. गोंधळी नगरसेवकांचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय सभेने घेतला.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत महापालिका सर्वसाधारण सभा सुरू होती. भडकलगेटचे एमआयएम नगरसेवक गंगाधर ढगे यांनी लेखाशीर्षक बदलण्याचा ठराव ठेवला होता. त्यांनी अर्थसंकल्पात सुचविलेले रस्त्याचे काम १०० कोटींच्या कामांमध्ये आले आहे. त्यामुळे रस्त्याचा निधी दुसरीकडे वळविण्याचा ठराव ढगे यांचा होता. या संदर्भात महापौैर घोडेले, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत होते. याचवेळी ढगे यांनी आवाज चढवून प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. शब्दाला शब्द वाढत गेला. ढगे यांनी महापौैरांवर आरोप सुरू केले. त्यामुळे त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी वॉर्ड क्र. ४० गणेशनगर येथील चौैकात ‘हिंदू राष्ट्र चौैक’ म्हणून कमान उभारणीचा प्रस्ताव ठेवला होता.

या ठरावाला एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी कडाडून विरोध दर्शवीत विषयपत्रिका फाडली. महापौैरांनी त्यांना वारंवार शांत राहण्याची सूचना केल्यानंतरही त्यांचा गोंधळ कमी होत नव्हता. शेवटी त्यांचेही नगरसेवकपद एक दिवसासाठी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौैरांनी केली. एमआयएम पक्षाकडून असे दबावतंत्र खपवून घेतले जाणार नाही, अशी ताकीदही महापौरांनी गटनेता नासेर सिद्दीकी यांना दिली. तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना समज द्या, महापालिकेतील हे सर्वोच्च सभागृह असून, येथील कामकाजाला काही नियम आणि शिष्टाचार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादcommissionerआयुक्त