शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

By संतोष हिरेमठ | Updated: June 18, 2025 11:49 IST

निपाणी फाटा येथे दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकले असल्याची माहिती, २५ प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातून लातूरकडे निघालेल्या एसटी बसचा निपाणी फाट्याजवळ समोरच्या छत्रपती संभाजीनगर ते इचलकरंजीबसवर धडकून बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने दुधवाल्याने अचानक दुचाकी थांबवल्याने झाला. यात एक कार आणि दोन बस एकमेकांवर धडकल्याने मोठे नुकसान झाले.  

सिडको बसस्थानक येथून सकाळी ८ वाजता लातूरसाठी बस निघाली. यावेळी बस पूर्ण भरलेली होती. ही बस निपाणी फाटा येथे पोहोचली. तेव्हा दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने दूधवाल्याने दुचाकी अचानक थांबवली. यामुळे पाठीमागील कारने ( एमएच ४६- एन १०३८ ) ब्रेक दाबले. हे पाहून त्यामागे असलेली छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी ( एमएच - ०९ - एफएल ७४३५) बसने देखील ब्रेक दाबले. यावेळी पाठीमागे असलेली छत्रपती संभाजीनगर - लातूर बस समोरच्या छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बसवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शीं पाचोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. एस. पठाडे यांनी सांगितले. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुचाकीवरील दूधवाला अपघातास कारणीभूतधुळे - सोलापूर महामार्गावरील निपाणी फाटाजवळ दुचाकीवरील दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने दुधवाल्याने अचानक दुचाकी थांबवली. त्यामुळे पाठीमागील कारने ब्रेक दाबले. अचानक समोरची कार थांबल्याने पाठीमागील छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बस कारवर धडकली. तर त्याच्या पाठीमागील छत्रपती संभाजीनगर - लातूर बस समोरच्या छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बस वर धडकली. तीन वाहने एकमेकांवर धडकण्यास कारणीभूत दूधवाला मात्र तेथून पसार झाल्याची माहिती पाचोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. एस. पठाडे यांनी दिली. 

इतर प्रवाशांना अन्य बसमधून रवाना केलेवाहतूक नियंत्रक पठाडे हे पाठीमागील छत्रपती संभाजीनगर - उदगीर बसमधून प्रवास करत होते. पठाडे यांनी तत्काळ अपघातस्थळी उतरून मदतकार्य केले. रुग्णवाहिका, सिडको बसस्थानक, वाहतूक पोलिस यांना माहिती दिली. दोन्ही बसमधील तब्बल २५ प्रवासी जखमी झाले. इतर प्रवाशांना अन्य बस मधून पुढे रवाना करण्यात आल्याची माहिती पठाडे यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर