शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकींचा चुराडा; दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 17:28 IST

परभणी-गंगाखेड महामार्गवरील दैठणाजवळील घटना 

- लक्ष्मण कच्छवेदैठणा (जि.परभणी) : दोन दुचाकी एका कारच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक गंभीर, तर सहा जण जखमी झाल्याची घटना परभणी- गंगाखेड महामार्गावरील दैठणाजवळ मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकींचा चुराडा झाला असून कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात विवेक अनिल नाईक (२४), दीपक मारुती कच्छवे (२५), दोघे रा. दैठणा यांना मृत घोषित केले. पवन माधव कच्छवे (२६) हा गंभीर जखमी झाला आहे.

परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका थांबताना दिसत नाही. मंगळवारी दैठणा येथून तीन युवक पोखर्णी नरसिंह येथे मित्राच्या लग्नासाठी जात होते. दरम्यान परभणीहून गंगाखेडकडे जाणारी एक कार भरधाव वेगात येत होती. त्याच वेळी एका हॉटेलसमोरून एक दुचाकी कारसमोर आली. यात कार आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या तीन युवकांच्या दुकचाकीलाही जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला. तर कार रस्त्याच्या खाली एका खड्ड्यात जाऊन पडली.

यात लग्नाला जाणारे दुचाकीवरील तिघे वर्गमित्र गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी परभणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विवेक नाईक, दीपक कच्छवे दैठणा यांना मृत घोषित केले. पवन कच्छवे हा गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य दुसऱ्या दुचाकीवरील दोघे आणि कारमधील चार जण किरकोळ जखमी आहेत. अपघाताची माहिती कळताच दैठणा बालाजी तिप्पलवाड, बळीराम मुंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी