शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

भाजीपाला विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:00 IST

पीन नंबर सांगण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

औरंगाबाद : पुंडलिकनगर रस्त्यावरील एका एटीएम सेंटरमधून बाहेर पडलेल्या भाजीपाला विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या त्रिकुटांपैकी दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या पाच तासांत बेड्या ठोक ल्या. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, त्यांच्याकडून लुटमारीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

शेख इम्रान शेख लाल(२२), शेख इरफान शेख लाल(वय २५,दोघे रा. गारखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, हनुमाननगर येथील रहिवासी अमोल रमेश दिवटे (२४)हा तरूण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अमोल पुंडलिकनगर रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तांत्रिक कारणामुळे एटीएममधून पैसे न निघाल्याने ते सेंटरमधून बाहेर पडले.

त्याचवेळी एटीएम सेंटरपासून काही अंतरावर ते चालत असताना त्यांचा पाठलाग क रून आलेल्या तीन जणांनी त्यांना अडविले. त्यांच्यापैकी दोन जणांनी त्यांच्या हात धरले तर तिसऱ्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावून  खिशातील पाकीट काढून घेतले. भाजीपाला विक्रीतून आलेले सुमारे साडेसतराशे रुपये आणि एटीएम कार्ड पाकिटमध्ये होते. हे पैसे पाहिल्यानंतर एटीएममधून काढलेले पैसे कुठे असे आरोपींनी अमोलला विचारले. त्यावेळी पैसे निघालेच नसल्याचे तो म्हणाला. मात्र आरोपींचा त्याच्यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याचा एटीएम कार्डचा पीन नंबर मागितला. मात्र अमोल पीन नंबर सांगण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

यावेळी अमोलने आरडाओरड केल्यानंतर ते तेथून पळून गेले. पुंडलिकनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी र उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे,  उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी शिवाजी गायकवाड, जालिंदर मांटे आणि इतर हे कोम्बिग आॅपरेशन राबवित होते. पोलिसांनी तपास करून पहाटे पाच वाजता इम्रान आणि इरफान यांना गारखेडा सुतगिरणी चौकात  पकडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस