शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या

By राम शिनगारे | Updated: June 23, 2024 20:44 IST

अमॅझॉन कंपनीची ११ लाखांची फसवणूक : दोन्ही आरोपींना कर्मचाऱ्यांनीच पकडले

छत्रपती संभाजीनगर : अमॅझॉन कंपनीकडून महागड्या वस्तू मागवून बनावट नावाने खोट्या पत्त्यावर मागवयाच्या, त्यातील वस्तू बदलून काही तरी कारण दाखवत कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडे पार्सल परत पाठवून कंपनीची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच सापळा रचून पर्दाफाश करीत उस्मानपुरा पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

नौमान नौशाद मुल्ला (२४) आणि नुर शेख शहजाद (२४, दोघे ही रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमॅझॉन कंपनीचे व्यवस्थापक मंगेश कान्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २१ जुन रोजी सकाळी कामगार ज्ञानेश्वर कळम यांच्याकडे दोन पार्सल दिले होते. त्या पार्सलमध्ये १० लाख ९६ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक टोस्टर साहीत्य होते. हे पार्सल अतुल आणि संजय अशा अपुर्ण नावाने होते. तसेच दोन्हीवर जांबीदा प्राईम, न्यु उस्मानपुरा असा एकच पत्ता होता.

कर्मचारी दिलेल्या पत्त्यावर जाऊन संबधीत क्रमांकावर कॉल केला असता पार्सल घेण्यासाठी दोन तरुण आले. त्यापैकी एका तरुणाने पार्सल घेतले तर दुसरा तरुण कळम यांच्याशी बोलत उभा राहीला. काही वेळाने पार्सल नेलेल्या तरुणाने पार्सल परत आणून देत माझा मोबाईल बंद असून तुमच्या कंपनीकडून आलेला ओटीपी देता येणार नाही, तुम्ही उद्या या असे सांगितले. यामुळे कळम यांनी पार्सल कंपनीच्या गोडावूनमध्ये आणुन जमा केले. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातून तक्रारदार कान्हे यांना कॉल आला.

त्यांनी दोन्ही पार्सलची माहिती घेत त्यावर एकच पत्ता आणि नाव अपुर्ण असल्याचे सांगत, यापुर्वी देखील परत आलेल्या पार्सलमध्ये दुसऱ्या वस्तु निघाल्यामुळे हे पार्सल तपासून घेण्याबाबत सुचना केल्या. कान्हे यांनी पार्सल तपासले असता या पार्सलवर जुनी चिठ्ठी आणि आतमध्ये कंपनीने पाठवलेल्या इलेक्ट्रीक टोस्टर ऐवजी निकृष्ट दर्जाचे मिक्सर निघाले. त्यावरून फसवूणक झाल्याचे स्पष्ट झाले.

अमॅझॉनच्या कर्मचाऱ्यांनी रचला सापळाग्राहक असलेल्या दोघांनी वस्तू घेऊन दुसऱ्या दिवशी बोलावले होते. त्यानुसार कळम हे वस्तु घेऊन गेले. त्याचवेळी अमॅझॉनच्या इतर कर्मचाऱ्यांनी कळम यांच्या पाठिमागचे थांबवण्याचा निर्णय घेतला. फसवणूक करणारे दोघे वस्तू घेण्यासाठी येताच तीन जणांनी झडप घालुन पकडले. त्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी