शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्याची खरेदी-विक्री करणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 14:09 IST

गस्तीवर असताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार महेश काळे याच्याजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली.

औरंगाबाद : गावठी कट्ट्याची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला.महेश काशिनाथ काळे (२५, रा . जामगाव , ता . गंगापूर ) आणि  सागर विजय कदम ( ३०, रा . आंबेवाडी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 

प्राप्त माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १६ जून रोजी गंगापूर तालुक्यात गस्तीवर असताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार महेश काळे याच्याजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. यानंतर पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप सोळुंके, कर्मचारी वसंत लटपटे, विठ्ठल राख, नवनाथ कोल्हे , विक्रम देशमुख , राजेंद्र जोशी, शेख नदीम, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे यांच्या पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आरोपी सागर कदम त्याच्याकडून चाळीस हजार रुपयात गावठी कट्टा विकत घेतल्याची कबुली दिली . तसेच खरेदी केलेला कट्टा गंगापूर येथे लपवून ठेवल्याचे सांगितले . पोलिसांनी पंचांच्या समक्ष गावठी कट्टा जप्त केला. यानंतर सागर कदम त्यालाही अटक केली . 

चौकशीदरम्यान, मध्यप्रदेशातून गावठी कट्टा आणून महेशला विक्री केल्याची कबुली सागरने दिली. आरोपी महेश काळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. अहमदनगर जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध दरोडे आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.  आरोपी सागरने अशाप्रकारे अनेकांना गावठी कट्ट्याची विक्री केली असावी. असा संशय त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबाद