शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:29 IST

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे.

ठळक मुद्देनवीन  ४००  चारचाकी, २००० दुचाकी रस्त्यावर

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद :  यंदाचा दसरा-दिवाळी सण वाहन उद्योगासाठी संजीवनी ठरला. दिवाळीतील मुहूर्तावर नवीन ४०० कार व २००० दुचाकी विक्री झाल्याची माहिती चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनकडून प्राप्त झाली आहे. 

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे. दिवाळी संपली तरी हा वेग कायम आहे. कारण, कार विक्रीत अजूनही महिना, दोन महिन्यांची वेटिंग सुरू आहे.  सर्व कंपन्याच्या मिळून ४०० कार व २००० दुचाकींची विक्री झाली.  कार उपलब्ध असत्या तर  या दिवाळीत ७०० कार विक्री झाल्या असत्या, असा दावा कार वितरकांनी केला आहे. नवरात्र ते दसऱ्यादरम्यान ४८०० दुचाकी व ७०० कार विक्री झाल्या होत्या. शहरात विविध कंपन्यांच्या सुमारे ४ ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यातील ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण ७० टक्के होते. ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी मिळत आहेत. त्यातील ५० ते ७० हजारांदरम्यानच्या दुचाकी विक्रीचे प्रमाण ७० टक्के आहे.

सणामुळे वाहन बाजाराला गती कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मर्यादा आल्या आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी स्वतःच्या वाहनतच प्रवास करण्याची मानसिकता तयार झाली. दसरा- दिवाळीनिमित्त वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून प्रचीती आली. -राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराईज आटोमोबाईल 

ग्रामीण भागातून दुचाकीला मागणीगतवर्षी बाजारात आर्थिक मंदी होती. त्यामुळे बाजारात उलाढालदेखील समाधानकारक झाली नव्हती. त्यातच यंदा कोरोनाचे संकट आल्याने बाजारात तसा उत्साह नव्हता. याचा दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम होईल, असे वाटले होते; पण शहराप्रमाणे ग्रामीण भागातून  मोठ्या प्रमाणात दुचाकी विक्री झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे यंदा ग्रामीण भागातून दुचाकीला मागणी वाढली आहे.- दीपक झुणझुणवाला, दुचाकी वितरक

मी हॉस्पिटलमध्ये काम करते. माझे घर व हॉस्पिटलमध्ये ५ कि.मी.चे अंतर आहे. मी पूर्वी शेअरिंग रिक्षात प्रवास करत असे; पण कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी मी स्वतःची दुचाकी खरेदी केली. -प्रियंका देशमुख, दुचाकी ग्राहक, उल्कानगरी

सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रणच. यामुळे मी स्वतःची कार खरेदी केली आहे. वाळूज परिसरात कंपनीत जाताना किंवा कामानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कारद्वारे सुरक्षित प्रवास करता येत आहे.  -प्रसन्न दहीभाते, ग्राहक, ज्योतीनगर 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबादbikeबाईक