शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत गुंतविलेले १२ लाख भागीदारानेच हाडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:18 IST

भागीदारीत टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी दिलेले ११ लाख ८६ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या बँक खात्यात जमा करून एक जणाने अन्य दोन भागीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देवेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा : कंपनीची रक्कम जमा केली स्वत:च्या खात्यात

औरंगाबाद : भागीदारीत टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी दिलेले ११ लाख ८६ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या बँक खात्यात जमा करून एक जणाने अन्य दोन भागीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. अनिल नवनाथ गिरी (रा.श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहन अण्णासाहेब हाडे (रा. श्रीहरी पार्क, श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) हे एका खाजगी शाळेत ग्रंथपाल आहेत. आरोपी गिरी हा त्यांच्या ओळखीचा आहे. २०१५ मध्ये गिरी बेरोजगार असल्याने त्याने काम मिळवून द्या, अशी विनंती हाडे यांना केली होती. यामुळे हाडे यांनी त्यांचे मित्र कैलास पवार यांच्याकडे कामाला लावले. गिरी याचा ट्रॅव्हल्स व्यवसायातील अनुभव पाहून पवार यांनी हाडे यांना फोन करून गिरीसोबत भागीदारीत ट्रॅव्हल्स कंपनी सुरू करू असे सांगितले. मात्र ही भागीदारी करताना तुम्हाला इमानदारी राखावी लागेल, ही अट हाडे यांनी गिरीला घातली. तेव्हा गिरीने डोळ्यातून अश्रू आणून त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यानंतर त्यांच्यात भागीदारीचा करारनामा झाला. करारनाम्यानुसार सहल बुकिंगसाठी लोकांकडून घेतली जाणारी रक्कम ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्यात जमा करणे गिरी यांना बंधनकारक केले. गिरीने मात्र लोकांकडून घेतलेली रक्कम ट्रॅव्हल्स कंपनीच्या संयुक्त खात्यात जमा न करता स्वत:च्या एक्सपाँडेबल हॉलिडे या बँक खात्यात जमा केले. याविषयी हाडे आणि पवार यांनी गिरीकडे विचारणा केली असता त्याने आपल्या कंपनीची जीएसटी नोंदणी क्रमांक अद्याप प्राप्त झाला नाही. ग्राहकांना जीएसटीची बिले द्यावी लागत असल्याने वैयक्तिक खात्यात रक्कम जमा करीत असल्याचा खुलासा केला. ही रक्कम सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय सुरुवातीलाच आपल्याला नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान आणखी काही सहलींची बुकिंग आल्यानंतर विमान आणि रेल्वे तिकीट बुकिंग करणे, हॉटेल्स बुकिंग करण्यासाठी गिरीने भागीदारांकडून पैसे घेतले. एक रुपयाही त्याने कंपनीच्या खात्यात जमा केला नाही. यामुळे हाडे आणि पवार यांनी त्यास हिशेब मागितला असता त्याने हिशेब देण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्याने तुम्हाला ११ लाख ८६ हजार रुपये देणे असल्याचे सांगितले आणि ही रक्कम त्याच्याकडे नसल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला.भागीदारी केली रद्दआरोपी गिरी ११ लाख ८६ हजार रुपये परत देत नसल्याचे पाहून हाडे आणि पवार यांनी दोन साक्षीदारांसमोर गिरीला बोलावून भागीदारीतील कंपनी रद्द केली. त्यानंतर काही दिवसांनी पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे तो म्हणू लागल्याने हाडे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आरोपी गिरीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी गुरुवारी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक तायडे तपास करीत आहेत.-----------

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी