शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत

By विकास राऊत | Published: March 12, 2024 12:03 PM

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : येथील लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू असून वाटाघाटीत जागा कोणाला सुटते आणि उमेदवार कोण, याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. गृहमंत्री शाह यांनी आपल्या भाषणात एमआयएमचे विद्यमान खा. इम्तियाज जलिल यांचा नामोल्लेख टाळून केलेली सूचक टीका, निवडक नेत्यांच्या बैठकीत दिलेला कानमंत्र आणि केलेले शक्तिप्रदर्शन लक्षात घेता संभाजीनगरची जागा भाजप लढविणार असल्याचे संकेत मिळाले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उमेदवारीच घोषित करून टाकली होती.

मात्र, मुंबई आणि दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यात आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेची आता भर पडली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी जोर लावला आहे. शिवाय, पक्षाबाहेरील कोणाही व्यक्तीस उमेदवारी दिली जाऊ नये, असा आग्रह धरल्याचे समजते तर दुसरीकडे मुंबईत झालेल्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ही जागा शिंदे गटाला सोडण्यास जोरदार विरोध केल्याचे समजते. भाजपकडे डॉ. कराड, मंत्री अतुल सावे यांच्यासारखे सक्षम उमेदवार असल्याने ही जागा आपणच लढवावी, असा आग्रह धरल्याचे समजते. या घडामोडींबाबत डॉ. कराड म्हणाले, वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला असून बाकी चर्चा म्हणजे वावड्या आहेत. आम्ही प्रचाराला लागलो आहोत.

मराठवाड्यातील तीन जागांचा वादमराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, हिंगोली या तीन जागांवरून महायुतीत वाद आहे तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचाही वाद आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले. शिष्टमंडळाने जागा आपलीच आहे, पक्षातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी केली तर भाजपचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटून जागा भाजपने का लढावी, हे ठामपणे मांडून आले.

शिंदे गटाचाच उमेदवार लढणारही जागा शिंदे गटाचाच उमेदवार लढेल. ही जागा आम्हाला सुटावी, असा मुद्दाच नाही. जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनाच लढणार आहे.- संदिपान भुमरे, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर

जागा शिवसेनेचीचजागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला संधी मिळावी. अशी मागणी आहे. उमेदवारी कुणाला द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.-संजय शिरसाट, आमदार, शिंदे गट

जागा तर भाजपच लढेल....भाजपने पूर्ण मतदारसंघात काम केले असून, सध्याही काम सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे. भाजपला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.-शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

हा मतदारसंघ आमचाचजिल्ह्यात शिवसेनेचे आमदार पाहता ही जागा आमचीच आहे. भुमरे यांनी जिल्ह्यात अनेक गावांत कामांना निधी दिला आहे. तसेच हा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याने आमची मागणी आहे.-रमेश पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतSandipan Bhumreसंदीपान भुमरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाAurangabadऔरंगाबाद