शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सत्तार- भाजप कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:14 IST

सत्तार यांनी कार्यक्रमच ‘हायजॅक’ केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे

ठळक मुद्देएकाच जागेवर भाजप व आमदार सत्तार या दोन्ही गटांनी परवानगी मागितली दोन्ही गटांत वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी खा. रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांची भेट घेतली.

सिल्लोड : भाजपची महाजनादेश यात्रा बुधवारी २८ आॅगस्ट रोजी सिल्लोडमध्ये पोहोचणार आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी व आमदार अब्दुल सत्तार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. एकाच जागेसाठी दोघांनीही परवानगी मागितली. सत्तार यांनी हा कार्यक्रमच ‘हायजॅक’ केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे. 

सिल्लोडमधील प्रियदर्शनी चौकात एकाच जागेवर भाजप व आमदार सत्तार या दोन्ही गटांनी परवानगी मागितल्यामुळे तणाव वाढला असून, पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर दोन गटांत तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही गटांत वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी खा. रावसाहेब दानवे  व आ. संतोष दानवे यांची भेट घेतली. मात्र, वाद होणार नाही. कार्यक्रम शांततेत होईल. तुम्ही निश्चिंत राहा, असा विश्वास दानवे पिता-पुत्रांनी पोलिसांना दिल्याची गोपनीय माहिती आहे.

महाजनादेश यात्रेत अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन लोक जमा करत आहेत. या सभेत शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांना ताकद दाखविण्याचे काम अब्दुल सत्तार करताना दिसत आहेत. त्या तुलनेत सिल्लोड तालुक्यातील भाजप पदाधिकारी पक्षाच्या आदेशानुसार काम करत असल्याचे दिसत असले, तरी सत्तार यांच्या तुलनेत बॅनर, पोस्टर, प्रसिद्धीमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते कमी पडल्याचे चित्र आहे.

सत्तार यांच्या प्रवेशाची चर्चामुख्यमंत्र्यांच्या स्वागत समारंभातच आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा जोर धरत आहे. याहीवेळी त्यांचा प्रवेश होतो की त्यांना पुन्हा तारीख दिली जाते, हे उद्याच कळेल. मात्र, अब्दुल सत्तार यांनी या जनादेश यात्रेत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जोर लावला आहे.

हा भाजपचा कार्यक्रम आहेअब्दुल सत्तार काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे. सर्व कार्यक्रमाचे नियोजन भाजपने केले आहे. अब्दुल सत्तार यांचा प्रवेश होणार नाही, असा विश्वास तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी, सुनील मिरकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद