शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

चार दिवसांत करोडोंची उलाढाल

By admin | Updated: June 5, 2014 00:13 IST

अनुराग पोवळे, नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या सावळागोंधळ सुरू असून

अनुराग पोवळे, नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या सावळागोंधळ सुरू असून उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रजेवर असताना एका निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यावरील उपअभियंत्याकडे पदभार देवून करोडो रूपयांची देयके काढल्याची तसेच अनेक नियमबाह्य कामांना मंजुरी दिल्याची माहिती पुढे आली आहे़ याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी या चार दिवसांतील कामाचा अहवाल मागितला असून सेवानिवृत्त झालेल्या उपअभियंत्याने मात्र तो अहवाल अद्याप सादर केला नाही़ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रजेवर जाण्याच्या तयारीत होते़ त्यांनी १० दिवसांची रजा मागितली होती़ मात्र प्रत्यक्षात ते चार दिवसांच्या म्हणजे २६ ते २९ मे या कालावधीत रजेवर होते़ ३० रोजी तर ते कार्यालयात हजर झाले होते़ दरम्यान, या काळात जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागाचा कार्यभार हा नांदेड उपविभागाचे प्रभारी उपअभियंता वहाब यांच्याकडे सोपविण्यात आला़ उत्तर विभागात चार दिवसांच्या या कार्यकालात करोडो रूपयांची देयके अदा करण्यात आली़ यात अनेक देयके मागील काळातील आहेत़ तसेच अनेक नव्या कामांना मंजुरीही दिली़ ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या सूचना व दबावानुसार करण्यात आली असल्याचीही चर्चा सुरू आहे़ याबाबतची कुणकुण लागताच जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता तायडे यांना यासंदर्भातील अहवाल मागितला आहे़ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या अनेक कामे ही पदाधिकार्‍यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनाच दिली जात आहेत़ ही कामे दिली जात असताना काम वाटपांच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे़ याबाबत बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी घेतलेली सहकार्याची भूमिकाही संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे़ अनेक कामे ही पूर्ण न होताच देयकेही अदा केली जात आहेत़ परिणामी जि़ प़ कंत्राटदारांची चांदी होत आह़े जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारतीची संरक्षक भिंत काही दिवसांपूर्वी पाडली गेली असताना त्याबाबत कोणतीही कारवाई जि़ प़ ने केली नाही़ त्यातच आता जिल्हा परिषदेने मुख्यालय परिसरात नालीचे काम सुरू केले असून हे काम संरक्षक भिंतीपासून जवळपास ३ फूट आत सुरू आहे़ त्यामुळे नालीच्या बाजूची जागा खाजगी मालकाच्या घशात घातली जाते की काय, अशी परिस्थिती आहे़ याकडे जिल्हा परिषदेत जाणार्‍या अधिकारी व पदाधिकार्‍यांनीही दुर्लक्षच केले आहे़ विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारापाशीच हे काम सुरू आहे़ याबाबतीत आता मुख्य कार्यकारी अधिकारी काळे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे़ ्न्नजिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे यांना रजेच्या काळातील चार दिवसांत झालेल्या कामांचा अहवाल मागण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सूचना दिल्या़ या सूचनेनुसार तायडे यांनी त्यांच्या रजेच्या काळात कार्यभार सांभाळणार्‍या उपअभियंता वहाब यांच्याकडे अहवाल मागितला आहे़ प्रत्यक्षात वहाब हे ३१ मे रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले़ त्यामुळे निवृत्तीनंतर ते आता अहवाल सादर करतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे़