शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

तूर, हरभरा दरात तेजी, किराणा स्थिर

By admin | Updated: March 28, 2016 00:08 IST

जालना : दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीत शांतता असली तरी या आठवड्यात तूर, हरभरा, सोयाबीन आदी भुसार मालांचे भाव वाढण्यासोबतच आवकही बऱ्यापैकी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना : दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीत शांतता असली तरी या आठवड्यात तूर, हरभरा, सोयाबीन आदी भुसार मालांचे भाव वाढण्यासोबतच आवकही बऱ्यापैकी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत या आठवड्यात तुरीचे भावत तीनशे ते चारशे रूपयांनी वधारले आहेत. तुरीचे भाव प्रति क्विंटलला ८८०० - ८००० दरम्यान आहेत. गत काही दिवसांपूर्वी भाव कमी झाले होते. आवक ५०० क्विंटलपेक्षा जास्त होत आहे. हरभऱ्याचे भावही ४३०० ते ४४५० दरम्यान आहेत. आवक १ हजार क्विंटल होत आहे. सोयाबीनची आवक दाररोज ४०० क्विंटल एवढी असून, भाव ३९५० ते ३८०० दरम्यान आहेत. भुसार मालाचे भाव बऱ्यापैकी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गव्हाचे भावही १६०० ते २२०० प्रति क्विंटल दरम्यान आहेत. आवक १ हजार पोत्यांची होत आहे. पेशी गहू ३५०० रूपये प्रति क्विंटल आहे. पेशी गव्हाची आवक तुलनेने कमी आहे. ज्वारीचे भाव १६०० ते २२०० रूपये प्रति क्विंटल आहेत. आवक १ हजार पोत्यांपेक्षा जास्त आहे. भुसार माल वगळता अन्य मालाचे भाव स्थिर आहेत. यात प्रामुख्याने किराणा बाजारात शांतता आहे. लग्नसराई असली तरी मालाची आवक तसेच भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साखरेच्या भावातही तेजी नाही. साखर बाजारपेठेतही भाव स्थिर असल्याने मालाची आवक कमी आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारसह विविध अन्य मालाची ठोक दुकाने आहेत. दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईमुळे भाजीपाला तसेच फळ मार्केटही शांत आहेत. टरबूज, खरबूज तसेच शहाळ्यांची आवक वाढत आहे. दिवसाकाठी एक ट्रक माल येत असल्याचे संबंधित व्यापारी सांगतात. अननसची मागणी वाढली आहे. ग्रामीण दुष्काळामुळे शुकशुकाट असल्यामुळे त्याचा परिणाम बाजार समितीत दिसून येतो. एरवी असलेली वर्दळ रोडावली आहे. मोसंबीची आवक किरकोळ स्वरूपाची आहे. या विषयी बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले म्हणाले की, या आठवड्यात भुसार मालाचे भाव वधारले असले तरी इतर मालाचे भाव स्थिर आहेत. विशेषत: तूर, हभरा आदींचे भावात चांगली तेजी आल्याने व्यापारी तसेच शेतकरी समाधानी आहेत. दुष्काळी परिस्थितीचा काहीअंशी परिणाम होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)