शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात भक्तीचा मळा

By admin | Updated: October 8, 2014 00:51 IST

तुळजापूर : श्री तुळजा भवानीची चार दिवसीय श्रमनिद्रा बुधवारी ८ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास संपणार असून पंलगावरून देवीची सिंहासनावर पूर्वप्रतिष्ठापना होऊन नित्योपचार,

तुळजापूर : श्री तुळजा भवानीची चार दिवसीय श्रमनिद्रा बुधवारी ८ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास संपणार असून पंलगावरून देवीची सिंहासनावर पूर्वप्रतिष्ठापना होऊन नित्योपचार, अभिषेक पुजेस प्रारंभ होईल. दुपारी नित्योपचार अभिषेक पूजा व त्यानंतर अलंकार महापुजा मांडण्यात येणार आहे. रात्री अभिषेक पुजेनंतर सोलापूर येथील लाड समाजाच्या मानाच्या काठ्याबरोबर छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून महंताचा जोगवा हे धार्मिक विधीही यावेळी होणार आहे. दरम्यान, या उत्सवासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत लाखो भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत. तुळजापुरात बुधवारी श्री तुळजाभवानी मातेचा अश्विनी पौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त तुळजापूरकडे येणारे सर्वच रस्ते सोमवारी रात्रीपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. नळदुर्ग रस्त्यावर आंध्र, कर्नाटक, तेलंगणा व उमरगा परिसरातील हजारो भाविक ‘आई राजा उदो उदो, जय बोलो, जय मातादी’चा जयघोष करीत हलगी, ताशा, झांजाच्या वाद्यात व भक्तीगीतांवर नृत्य करीत शहरात दाखल होत आहेत. काही महिला भाविक नवसपूर्ती करण्यासाठी दंडवत घालत येताना दिसून येत आहेत. सोलापूर रस्त्यावरूनही हजारो भाविक घाटशीळ येथे दाखल होत असून, घाटशीळचे दर्शन घेऊन ते मंदिरात येत आहेत. मंगळवारी सकाळी मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती. मात्र, सायंकाळनंतर मंदिरातील दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांनी फुल्ल झाले होते. दरम्यान, दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पायी येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल झाले. व्यापारी, फेरीवाले यांचीही मोठी धावपळ उडाली. या पावसामुळे घाटशीळ रस्ता, आंबेडकर चौक, उस्मानाबाद रोडवर चिखल व पाणी साचल्याने भाविकांना चालणेही अवघड झाले होते. भाविकांची वाढती गर्दी पासून एसटी महामंडळाने सोलापूर, हुमनाबाद, गुलबर्गा या मार्गावर जादा बसगाड्या सुरू केल्या आहेत. सध्या जुन्या स्थानकातून सोलापूरसाठी तर नव्या स्थानकातून कर्नाटक, लातूरकडे जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत. महामार्गावर खड्ड्यांचा त्रासश्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये कर्नाटक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. यात काही भाविक विनावाहन (पायात काहीही न घालता) जातात. परंतु, तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने या पायी जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत चारचाकी वाहनांचीही रेलचेल दिसून आली. दरम्यान, मार्गावर प्रथमोपचार केंद्रे तसेच अन्नदानासाठी विविध संस्था, संघटनांच्या वतीने स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. (वार्ताहर)