लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनचा प्रयत्न करणाºयाला पोलिसांनी पकडले असून या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़मौजे निळा येथील स्वस्त धान्य दुकानदार रेशनचा काळा बाजार करीत असल्याची तक्रार आरोपीने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती़ त्यानंतर स्वातंत्र्यदिनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या तक्रारीवरुन कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ यावेळी अन्य एक साथीदार मोबाईलवर व्हिडीओ शुटींग करीत त्याला आत्महत्येसाठी प्रोत्साहन देत होता़ पोलिसांनी लगेच या दोघांनाही ताब्यात घेतले़