शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जिल्हा बँकांवर वर्चस्व राखण्याची खटपट; निवडणुकीला तीन महिने मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 20:07 IST

महाआघाडी सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संचारला उत्साह

- विजय सरवदे  

औरंगाबाद : राज्यातील ३१ पैकी २२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि २१ हजार २२५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांपैकी ८ हजार १९४ सोसायट्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या बँका व सोसायट्यांवर वर्चस्व राखण्यासाठी थकबाकीदार (मतदार) शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये, हे लक्षात घेऊन महाआघाडी सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 

या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील ७२ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदार सभासद (मतदार) शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. यंदा अवकाळी पाऊस, परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची माती झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या माध्यमातून २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.  सध्या राज्यभरात अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. काही ठिकाणी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बँकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देणे, कर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्डांचे नंबर प्रमाणित करणे आदी कामे सुरू आहेत. सहकार व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या कामात व्यस्त आहेत. सहकार विभागाच्या अधिनियमानुसार जिल्हा बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदारांना निवडणुकीत मतदान करता येत नाही. जे चालू थकबाकीदार सभासद शेतकरी आहेत, ते मतदान करू शकतात. मात्र, त्यांना निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त  शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊन त्यांना कर्जमुक्त करणे व त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी निवडणुकीला मुदतवाढ दिल्याचे वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे.

शासन आदेशात  काय म्हटले आहेसहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने २७ जानेवारी रोजी जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे की, जानेवारी ते जूनदरम्यान जिल्हा बँका व सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. सहकार विभागाचे बरेच अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या कामात व्यस्त राहतील. असे झाले तर, कर्जमुक्ती योजना रखडण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास थकबाकीदार शेतकरी पात्र राहणार नाहीत. अर्थात, या योजनेच्या मूळ हेतूलाच यामुळे बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येत आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादbankबँकElectionनिवडणूक