शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीमंडईच्या बांधकामातील ‘गडबड’ डागडुजीने झाकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:39 IST

औरंगपुरा येथे बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) तत्त्वावर सुरू असलेल्या औरंगपुरा भाजीमंडईच्या बांधकामाच्या फाऊंडेशनमध्ये असलेली गडबड डागडुजी करून झाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

ठळक मुद्दे पाटील कन्स्ट्रक्शन्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या  संस्थेने तातडीने डागडुजीसाठी लेबर लावून केलेली गडबड झाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान महापालिकेच्या बीओटी कक्षाने या प्रकरणात कुठलीही दखल घेतलेली नसून उलट कंत्राटदारालाच तातडीने डागडुजी करण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्ट होत आहे

औरंगाबाद : औरंगपुरा येथे बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) तत्त्वावर सुरू असलेल्या औरंगपुरा भाजीमंडईच्या बांधकामाच्या फाऊंडेशनमध्ये असलेली गडबड डागडुजी करून झाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

स्लॅब भरताना खडीचा भरणा अधिक असल्याचे, कॉलममध्ये कमी-अधिक प्रमाणात काँक्रीट भरल्याचे वृत्त लोकमतने ११ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर कंत्राटदार पाटील कन्स्ट्रक्शन्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या  संस्थेने तातडीने डागडुजीसाठी लेबर लावून केलेली गडबड झाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान महापालिकेच्या बीओटी कक्षाने या प्रकरणात कुठलीही दखल घेतलेली नसून उलट कंत्राटदारालाच तातडीने डागडुजी करण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्ट होत आहे. बीओटी कक्षाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना कोर्टाच्या कामातून वेळ नाही, तर सत्ताधाºयांना कचरा प्रकरणातून उसंत मिळत नसल्यामुळे त्या इमारतीच्या कामाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. शिवाय कंत्राटदार हे शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्याशी पंगा घेणार कोण? असा सवाल विरोधकांनी केला आहे. 

त्या कामाचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची मागणी जोर धरीत आहे. १८ महिन्यांच्या करारावर ती जागा विकसित करण्यासाठी दिलेली असताना चार वर्षांत तेथे काहीही झालेले नसून जे बांधकाम सुरू आहे ते देखील गडबडयुक्त असल्यामुळे भविष्यात ही इमारत सर्वसामान्यांच्या जिवावर बेतणार नाही याची हमी कोण देणार, असा प्रश्न आहे. 

महापौर म्हणाले...पाटील कन्स्ट्रक्शन्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही संस्था औरंगपुरा भाजीमंडईचे बांधकाम करीत आहे. त्या कामाबाबत पालिकेने काय निर्णय घेतला आहे. यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले, बीओटी सेक्शनचे कामकाज पाहणारे कार्यकारी अभियंता सिकंदर अली हे  दोन दिवसांपासून कोर्टाच्या कामात व्यस्त आहेत.

बीओटीच्या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याबाबत त्यांना आदेशित केले आहे. सदरील बांधकामाची तातडीने पाहणी करण्यात येईल. प्रोजेक्टची किंमत ११ कोटी ७० लाख आहे. १८ महिन्यांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन होती. क्षेत्रफळ २०५० चौ़ मी़ असून, मनपाला दुकाने व ओटे मिळतील, शिवाय प्रिमियम ३१ लाख रुपये आणि भाड्यापोटी दरवर्षी ४४ लाख रुपये मिळण्याचा करार आहे. चार वर्षे झाली अजून पालिकेच्या तिजोरीत दमडीही पडलेली नाही. पालिकेला बीओटीतून काय मिळाले, हेदेखील बैठकीनंतरच समोर येईल, असेही महापौर म्हणाले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद