शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

नंदनवन कॉलनीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

औरंगाबाद : शहरातील काही बँकांचे अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) ची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.

औरंगाबाद : शहरातील काही बँकांचे अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) ची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नंदनवन कॉलनी येथील जयजवान टॉवर इमारतीमध्ये असलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. नंदनवन कॉलनी या उच्चभ्रू वसाहतीमधील जयजवान टॉवर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएमच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरक्षारक्षक नेमलेला नाही. बेवारस आणि सुरक्षा नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजून ४ मिनिटांच्या सुमारास दोन चोरटे घुसले. त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न के ला. सुमारे आठ ते दहा मिनिटे त्यांचे प्रयत्न सुरू होते. बुधवारी सकाळी काही ग्राहक पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसला. त्यांनी ही माहिती छावणी पोलिसांना दिली. पोलिसांनी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना कळविले. शेवटी इपिक कंपनीचे औरंगाबाद चॅनल व्यवस्थापक सुशील भीमराव धुळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी दोन अनोळखी चोरट्यांविरोधात छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे ठाणे अंमलदार पाईकराव यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वीची घटनामागील आठवड्यात चोरट्यांनी टिकावच्या साह्याने नवामोंढा परिसरातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शहरातील सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम मशीनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.