शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने दुचाकीला धडक देऊन ५० मीटरपर्यंत फरफटले; नशीब बलवत्तर म्हणून पती-पत्नी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 12:10 IST

Husband and wife survived in accident at Waluj तिरंगा चौकाजवळ औरंगाबादकडून नगरकडे दगडी कोळसा घेऊन वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१६, टी.१२३३) दांगुडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

ठळक मुद्देचंद्रभान सखाराम दांगुडे (रा. वाणेगाव, ता. फुलंब्री) हे पत्नी चंद्रकला दांगुडे यांच्यासह दुचाकीने (एम.एच.२०, सी.एक्स २७१७) बजाजनगरात नातेवाइकास भेटण्यासाठी चालले होते. ट्रकने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार पती-पत्नी जोराच्या धक्क्याने दूर फेकले जाऊन रस्त्यावर बाजूला पडले, तर ट्रकच्या खाली दुचाकी अडकल्यानंतर चालकाने न थांबता सुसाट ट्रक दामटला.

वाळूज महानगर : भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानंतर दुचाकीला जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना गुरुवारी (दि. १) दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात घडली. ट्रकचा धक्का लागल्यानंतर दुचाकीस्वार पती-पत्नी दूर फेकल्याने दोघेही किरकोळ जखमी झाले; परंतु सुदैवाने बालंबाल बचावले.

चंद्रभान सखाराम दांगुडे (रा. वाणेगाव, ता. फुलंब्री) हे पत्नी चंद्रकला दांगुडे यांच्यासह दुचाकीने (एम.एच.२०, सी.एक्स २७१७) बजाजनगरात नातेवाइकास भेटण्यासाठी चालले होते. तिरंगा चौकाजवळ औरंगाबादकडून नगरकडे दगडी कोळसा घेऊन वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१६, टी.१२३३) दांगुडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार पती-पत्नी जोराच्या धक्क्याने दूर फेकले जाऊन रस्त्यावर बाजूला पडले, तर ट्रकच्या खाली दुचाकी अडकल्यानंतर चालकाने न थांबता सुसाट ट्रक दामटला. पंढरपुरातील मच्छी मार्केटमसोर नागरिकांनी आरडा-ओरड करून ट्रक रोखला. संतप्त जमावाने ट्रक चालकास चांगलाच चोप दिला. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्धन गवळी, पंढरीनाथ साबळे, शेख बाबर, शेखर राऊतराय, सचिन खरात, आदींनी घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून ट्रकचालकाची सुटका केली.

दुचाकीला ५० मीटरपर्यंत फरफटत नेलेया अपघातानंतर मारहाणीच्या भीतीने ट्रकचालकाने घटनास्थळावरून वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यात ट्रकखाली अडकलेल्या दुचाकीला जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. नागरिक व वाहनधारकांनी आरडा-ओरड करून ट्रक चालकास ट्रक थांबविण्यास भाग पाडले. केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून या अपघातात दांगुडे पत्नी-पत्नी बालंबाल बचावले. अपघातानंतर किरकोळ जखमी दाम्पत्यास नागरिकांनी धीर देत पंढरपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर या दाम्पत्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या अपघाताची माहिती ट्रक चालकाने मालकास दिल्याने किरकोळ जखमी दाम्पत्यांची भेट घेऊन रुग्णालयाचा खर्च व दुचाकीचे झालेले नुकसान भरून देण्याची तयारी मालकाने दर्शविल्याने हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

वाहनांच्या लांबच-लांब रांगानागरिकांनी काही अंतरावर हा ट्रक अडवून चालकास चोप दिला. यामुळे रस्त्यावर मोठा जमाव जमला. ट्रक रस्त्यावर उभा असल्याने औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद