शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कुलगुरू वि.ल. धारुरकर यांच्या लाच घेतानाच्या व्हिडिओने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 20:13 IST

त्रिपूरातील स्थानिक वृत्तवाहिनीने केले स्टिंग 

ठळक मुद्देछपाईच्या कंत्राटात १० टक्क्याची मागणी

औरंगाबाद : त्रिपूरा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारुरकर यांचा छपाईच्या कंत्राटात १० टक्के कमिशन मागण्याचा आणि कंत्राटदाराच्या घरीच पैसे स्विकारतानाचे स्टिंग ऑपरेशन त्रिपुरातील एका वृत्तवाहिनीने केले आहे. याविषयी राष्ट्रीय वृत्तपत्र ‘द हिंदू’मध्ये बातमी छापण्यात आली आहे. ही बातमी आणि पैसे स्विकारतानाचा व्हिडिओ शुक्रवारी (दि.६) महाराष्ट्रभर व्हायरल झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. धारुरकर यांचे ‘व्हॅनगार्ड न्यूज’ या स्थानिक वृत्त वाहिनीने ‘ऑपरेशन व्हाईट कॉलर’ नावाने स्टिंग केले आहे.  १४ लाख रुपयांच्या प्रिटिंगच्या बिलाचा धनादेश आज मिळणार आहे. त्याचे पैसे आज द्या आणि ५ लाख ८० हजार रुपयांच्या प्रिंटिंगच्या वर्क ऑर्डरचे पैसे पुढच्या महिन्यात दिले तरी चालतील. ६० लाख रुपयांच्या वर्क ऑर्डरचे १० टक्केप्रमाणे पैसे द्यावे लागतील,असेही बोलताना डॉ. धारुरकर दिसत आहेत.  यामध्ये एवढी मार्जीन नाही सर, असे सांगत प्रिंटिंग फर्मचा प्रतिनिधी लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती करतो आणि रखीए सर म्हणत पैशांचे बंडल डॉ. धारुरकर यांचया हातात देतो. 

डॉ. धारुरकरांसोबत असलेली एक व्यक्ती लाचेची ही रक्कम बॅगेत ठेवतानाही या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे. हे स्टिंग डॉ. धारुरकर यांच्या कुलगुरू कार्यालयातील अँटिचेबर आणि प्रिंटिंग फर्मचे प्रतिनिधी सुरेंद्र सेठीया यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी करण्यात आल्याचा दावाही यात केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना व्हॅनगार्ड वृत्तवाहिनीचे संपादक सेवक भट्टाचार्जी  म्हणतात की, डॉ. धारुरकर हे त्रिपूरा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा आणि लौकीक अबाधित राखण्यासाठी आम्ही व्हिसलब्लोअर म्हणून काम करत आहेत. याविषयीचा व्हिडिओ आणि पोस्ट फेसबुक, व्हाटस्अपवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. यावर मोठ्या प्रमाणात चर्चाही करण्यात येत आहे. यात डॉ. धारुरकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या पीएच.डी. शोधप्रबंधांची चौकशा करण्याची मागणीही सोशल मिडियातुन करण्यात येत आहे.

माझ्याविरोधातील षडयंत्रया व्हायरल व्हिडिओ आणि पोस्टविषयी कुलगुरू डॉ. वि.ल. धारुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे आपल्याविरोधात स्थानिकांनी रचलेले षडयंत्र असल्याचे सांगितले. सध्या मी व्यवस्थित असून, नियमित कामकाज करत असल्याचेही डॉ. धारुरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Tripuraत्रिपुराEducation Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद