शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेची त्रैवार्षिक निवडणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 00:09 IST

औरंगाबाद : श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेच्या महाराष्ट्र प्रांताचे अधिवेशन व त्रैवार्षिक निवडणूक श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, जटवाडा (जि. औरंगाबाद) येथे उत्साहात पार पडली

औरंगाबाद : श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेच्या महाराष्ट्र प्रांताचे अधिवेशन व त्रैवार्षिक निवडणूक श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, जटवाडा (जि. औरंगाबाद) येथे जैन मुनीश्री प. पू. विश्वयशसागर महाराज व मन्मितसागर महाराज यांच्या सान्निध्यात रविवारी उत्साहात पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रांताच्या धर्म संरक्षिणी, तीर्थ संरक्षिणी, श्रुत संरक्षिणी व महिला महासभेची निवडणूक होऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.मंगलाचरण व प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी जटवाडा अतिशय क्षेत्राचे महामंत्री देवेंद्र काला, तर प्रमुख अतिथी म्हणून दिमापूर (आसाम) येथील प्रभातचंद टोंग्या (जैन), महेंद्रकुमार सोहनलाल सोनी (औरंगाबाद), नीरजकुमार सुधाकर साहुजी, वसंतराव वायकोस गुरुजी, सूरज सुंदरलाल पेंढारी आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश अजमेरा, देवेंद्र काला, ज्ञानदिवाकर वसंतराव वायकोस व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचीही यावेळी भाषणे झाली. जैन तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत वसंतराव वायकोस यांनी ११८ पाठशाळांचे नियोजन उत्तमरीत्या सुरू असल्याची माहिती दिली.प्रवचनजैन मुनी प.पू. विश्वयशसागर महाराजांचे ‘ऋषी व कृषीप्रधान भारत देश’ या विषयावर प्रवचन झाले. संचालन प्राचार्य विजय पाटोदी यांनी केले. कार्यक्रमास जटवाडा क्षेत्राचे अध्यक्ष सुरेंद्र साहुजी, उपाध्यक्ष महावीर साहुजी, जयचंद ठोळे, मदनलाल लोहाडे, विजय पाटोदी, पीयूष कासलीवाल, संदीप ठोळे, मनोज साहुजी, दिलीप कासलीवाल, मंगला गोसावी, अरुणा पाटणी, कंचनदेवी टोंग्या, शांता कटारिया आदी उपस्थित होते.चार अतिथींचा पदवीने सन्मानचार अतिथींना विशेष पदवी बहाल करण्यात आली. महेंद्रकुमार सोनी यांना ‘श्रावक शिरोमणी’, वसंतराव वायकोस यांना ‘ज्ञान दिवाकर’, नीरजकुमार साहुजी यांना ‘युवारत्न’ तर सूरज पेंढारी यांना ‘श्रावकरत्न’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. भंडारदाते प्रकाशचंद, सचिन, डॉ. राहुल, चंदादेवी कासलीवाल (औरंगाबाद) यांचा सत्कार करण्यात आला.पुस्तकाचे प्रकाशनयावेळी जैन महासभेतर्फे डॉ. जिनेश्वरदास जैन लिखित ‘जैन अ‍ॅरकॉलॉजिकल साईटस् आऊटसाईड इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विजयी झालेले पदाधिकारी महाराष्ट्र प्रांत अध्यक्षपदी (धर्मसंरक्षिणी) सुमेरकुमार काला, कार्याध्यक्ष-देवेंद्रकुमार काला व महामंत्रीपदी डी.बी. पहाडे यांची फेरनिवड करण्यात आली. तीर्थसंरक्षिणीवर अध्यक्ष म्हणून प्रकाश पूरणमल पाटणी, महामंत्री-महावीर दीपचंद ठोळे, श्रुतसंरक्षिणीवर अध्यक्ष म्हणून अरुण केशरीमल पाटणी व महामंत्रीपदी सूरज सुंदरलाल पेंढारी हे विजयी झाले. धर्मसंरक्षिणीवर मराठवाडा अध्यक्षपदी प्रकाश कस्तूरचंद कासलीवाल, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी सुरेश अजमेरा (नंदुरबार), मराठवाडा महिला महासभेच्या अध्यक्षपदी अरुणा विजय पाटणी, महामंत्री-शांता कटारिया, औरंगाबाद जिल्हा महिला महासभेच्या अध्यक्षपदी आशादेवी काला, महामंत्री-चंदा कासलीवाल, औरंगाबाद शहराध्यक्ष राजकुंवर ठोळे, पैठण तालुकाध्यक्ष-किशोर मनोहरराव भाकरे, गंगापूर-सचिन प्रकाशचंद पांडे, सोयगाव - उदय शांतीनाथ जैन, वैजापूर-प्रकाशचंद अनंतकुमार पहाडे, कन्नड-संतोषकुमार मन्नूलाल ठोळे, फुलंब्री-हिरालाल बाबूलाल पाटणी तर सिल्लोड तालुकाध्यक्षपदी अनिलकुमार त्रिलोकचंद लोहाडे यांची निवड झाली.