हिंगोली : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्धल मंगळवारी जिल्हाभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. काही ठिकाणी बंदही पाळण्यात आला. समाजवादी पार्टी हिंगोलीत समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख नईम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविकुमार जयस्वाल, तौफिक अहेमद खान, खंडेराव बेंगाळ, शेख बासीत, उत्तम नागरे, शेख नफीस पहेलवान, सय्यद रोशन, पठाण आलमखान, सय्यद शोएब, शेख आवेज, शेख हमीद, पठाण रऊपखान, शंकरअण्णा राटनालु, शेख तौफीक अहेमद मजीदखान आदी उपस्थित होते. पीपल्स बँकेत श्रद्धांजली हिंगोली शहरातील पीपल्स को. बँकेत झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमास बँकेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश देवडा, अध्यक्ष सुनील देवडा, उपाध्यक्ष रूपचंद बज, सरव्यवस्थापक संजय राजेश्वर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. हिंगोली शहरातील भाजप कार्यकर्ते डॉ. राजेश भोसले यांच्यासह रोहयो समितीचे माजी सदस्य तथा पदवीधर संघटक पंजाबराव कुटे, कैैलास भुजंगळे यांनी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेस कमिटी हिंगोलीत काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, पं. स. सभापती सी. ए. बनसोडे, संजय गांधी निराधार योजनेचे समितीचे अध्यक्ष आबेदअली जहागीरदार, मिलिंद उबाळे, पं. स. सदस्य संतोष जगताप, उत्तमराव जगताप, रामराव जगताप, ज्ञानेश्वर गोटरे, सुमित चौधरी, कैलास शहाणे, नजीरखाँ पठाण, विश्वासराव बांगर, गणेश साहू, अफरोजअली जहागीरदार, रामचंद्र कावरखे, बंडू बांगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाभरात बंद जिल्हाभरात काही ठिकाणी बुधवारी बंद पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. हिंगोली शहरात सकाळपासून बंद पाळण्यात आला. शहरातील बहुतांश दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, व्यापरी पेठा बंद होत्या. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. सकाळपासून बरीच दुकाने बंद होती; पण बुधवारी मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात आला. वसमत शहरात कडकडीत बंद वसमत : शहरात मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून बुधवारी वसमत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास व्यापार्यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. परिणामी बुधवारी वसमत कडकडीत बंद राहिले. मुंडे यांचे निधन झाल्याने वसमतमध्ये मंगळवारी श्रद्धांजली वाहून बुधवारी सर्वपक्षीय बंद पाळण्याचा निर्णय झाला. शहरातील सर्व व्यापार्यांनी बुधवारी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने कडकडीत बंद राहिला. आजचा बंद अभूतपूर्व राहिला. व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासून उघडली नाहीत. दिवसभर सर्व लहान मोठी दुकाने व सर्व व्यवहार बंद होते. आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा येथे बंद पाळण्यात आला. त्यात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक गावांत भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. वारंगा येथे व्यापार्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पं. स. सदस्य विजय अवचार, नारायण सावळे, दत्ता करपे, तुकाराम ढोणे आदी उपस्थित होते. पानकनेरगाव येथे बंद पानकनेरगाव : येथे बुधवारी दिवसभर कडकडीत बंद पाळून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्यापार्यांनीसुुद्धा आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून दु:ख व्यक्त केले. पानकनेरगाव येथे ३३ के. व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. कुरूंदा येथे दुकाने बंद कुरूंदा : येथे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल ४ जून रोजी व्यापार्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. तसेच नर्सी नामदेव, हट्टा येथेही बंद पाळण्यात आला. (वार्ताहर)
जिल्हाभरात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली
By admin | Updated: June 5, 2014 00:14 IST