शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विना परवाना कोरोना रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:49 IST

आरोग्य विभागाची परवानगी न घेता वाळूजमहानगर परिसरातील अनेक खाजगी रुग्णालयात बिनधास्तपणे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या खाजगी रुग्णालयांकडून भरमसाठ शुल्क वसुल करुन रुग्णांची लुट केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

वाळूज महानगर : आरोग्य विभागाची परवानगी न घेता वाळूजमहानगर परिसरातील अनेक खाजगी रुग्णालयात बिनधास्तपणे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या खाजगी रुग्णालयांकडून भरमसाठ शुल्क वसुल करुन रुग्णांची लुट केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारीनंतर आरोग्य विभागाच्यावतीने बजाजनगरातील ७ खाजगी रुग्णालयानांना बुधवार दि.३०  रोजी  नोटीस बजावण्यात आली.

उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांकडून खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर भरमसाठ शुल्क आकारुन त्यांची लुट करीत आहेत.  उद्योगनगरीत  कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची फारशी काळजी घेतली जात नसल्याचा गैरसमज निर्माण झाल्यामुळे अनेकजण खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. 

बजाजनगरातील जिवनज्योत हॉस्पीटल, ममता हॉस्पीटल, घृष्णेश्वर हॉस्पीटल, अष्टविनायक हॉस्पीटल, लिलासन हॉस्पीटल आदी खाजगी रुग्णालयात आरोग्य विभागाची परवानगी न घेता बिनधास्तपणे कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहे. या खाजगी रुग्णालयांकडून भरमसाठ शुल्क वसुल केली जात असल्याची ओरड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सुरु आहे. खाजगी रुग्णालयाकडून होत असलेल्या लुटीच्या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती.

यात अष्टविनायक हॉस्पीटलच्यावतीने कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाकडे परवानगी मागितली असून त्यांना अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ व डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले.  विना परवाना सुरु असलेल्या  या खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांना भरती करण्यात येऊ नये, उपचारसाठी आलेल्या रुग्णांना मान्यता प्राप्त रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला द्यावा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल