शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार; बिलेही अवाच्या सव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:59 IST

coronavirus in Aurangabad शहरात एकूण ४६ ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ११ केंद्रे ही शासकीय, महापालिकेची आहेत. 

ठळक मुद्देअनेक ठिकाणी ‘ऑन कॉल डॉक्टर खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट केली

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : कोविड महामारीत काही खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट केली. प्रत्येक ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान एम.डी. मेडिसिन डॉक्टर असायलाच हवा, हा निकष धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल करून घेण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे रुग्णांच्या बिलात एम.डी. मेडिसिन डॉक्टरने पाच वेळेस तपासणी केल्याचा उल्लेख करून बिले काढली जात आहेत. महाराष्ट्र शासनाने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही निकष ठरवून दिले. त्यानुसार शहरात एकूण ४६ ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ११ केंद्रे ही शासकीय, महापालिकेची आहेत. 

‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा आढावा घेतला.  तेथे रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर दिसून आले नाहीत. काही ठिकाणी ऑन कॉल एम.डी. मेडिसिन डॉक्टर नियुक्त केले आहेत. तर काही ठिकाणी स्वतः चेस्ट फिजिशियन एम.डी. मेडिसिनची भूमिका बजावत आहेत. महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड सेंटरची परवानगी देताना निकषांची अंमलबजावणी होते की नाही. हे बारकाईने तपासले नाही. खाजगी रुग्णालयांनी छोट्या जागेमध्ये  जास्त बेड टाकून रुग्ण भरती करणे सुरू केले आहे. आय.सी.यू. बेड किती जागेत, किती अंतरावर असावेत, याचे कोणतेही निकष पाळलेले नाहीत. काही खाजगी रुग्णालये एम.डी. मेडिसिन डॉक्टरच्या नावावर बिलात मोठी रक्कम उकळत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी एम.डी. मेडिसिन डॉक्टर किती वेळेस आला ते सीसीटीव्हीमध्ये दाखवा, अशी मागणी करताच  रुग्णालयांनी माघार घेतली. असाच एक प्रकार घाटीजवळच्या एका कोविड सेंटरमध्ये घडला.

...अशी आहे विदारक अवस्थासांगवीकर हॉस्पिटलमुकुंदवाडी येथील सांगवीकर रुग्णालयात अत्यंत छोट्या जागेत आय.सी.यू. उभारले आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात शुल्क आकारणीचा बोर्ड आहे. बोर्डावर जेवढी रक्कम दर्शविण्यात आली आहे. त्यापेक्षा दहा पट जास्त बिल तयार करण्यात येते. विशेष बाब म्हणजे रुग्णालयात एम.डी. मेडिसिन डॉक्टर नाही. रुग्णालय चालक डॉ. पांडुरंग सांगवीकर म्हणतात की, मी स्वतः चेस्ट फिजिशियन आहे. मग एम.डी. मेडिसिन कशासाठी? 

निमाई हॉस्पिटलटीव्ही सेंटर भागातील निमाई हॉस्पिटल येथे तीन बालरोगतज्ज्ञ आहेत. ऑन कॉल पद्धतीवर डॉ. सत्यजित शिराळे यांची नेमणूक केली आहे. जेव्हा गरज असते तेव्हा संबंधित डॉक्टर येतात, असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला. १० ऑक्सिजन बेड, ८ आयसीयू बेड आहेत. 

धनवई हॉस्पिटलटीव्ही सेंटर रोडवरील  धनवई आणि सिंग या रुग्णालयात मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात २४ तास एम.डी. मेडिसिन डॉक्टर उपलब्ध आहेत. 

न्यू लाईफ बाल रुग्णालयन्यू लाईफ बाल रुग्णालयात एम.डी. मेडिसिन म्हणून डॉ. दिनेश चांडक काम पाहत आहेत. रुग्णांवर उपचार करताना कोणतीही अडचण नाही. महापालिकेने डी.सी.एच.सी. म्हणून आम्हाला परवानगी दिल्याचे डॉ. पांडुरंग नखाते यांनी सांगितले. 

रुग्णांवर उपचार महत्त्वाचेप्रत्येक रुग्णालयात २४ तास एमडी मेडिसिन असणे आवश्यक नाही. ऑन कॉल पद्धतीवर डॉक्टर बोलावले तरी काही हरकत नाही. महामारीत रुग्णांवर उपचार आवश्यक आहेत. ज्याठिकाणी एमडी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नाही आणि त्यांनी रुग्णांची तपासणी केलेली नसताना त्यांच्या बिलात एम.डी. मेडिसिनच्या नावावर पैसे उकळण्यात येत असतील, तर  रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. प्रत्येक रुग्णालयातील बिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नेमण्यात आले आहेत. -डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर