शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्समधील महिलेचे पावणेचार लाखांचे दागिने पळविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:51 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून खाजगी ट्रॅव्हल्सने औरंगाबादेत आलेल्या महिलेचे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून खाजगी ट्रॅव्हल्सने औरंगाबादेत आलेल्या महिलेचे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना १७ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो तुळजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.

उस्मानाबाद येथील तक्रारदार महिला ही १७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथून औरंगाबादकडे येण्यासाठी श्रीराम टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसल्या. १८ एप्रिलच्या सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या औरंगाबादेत आल्या.

प्रवासादरम्यान त्यांच्याजवळील पर्समध्ये दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या (पाटल्या), सहा तोळ्याच्या चार बांगड्या आणि रोख एक हजार रुपये असा सुमारे ३ लाख ७० हजारांचा ऐवज होता. हा ऐवज प्रवासादरम्यान चोरट्यांनी चोरून नेला. ही बाब औरंगाबादेत उतरल्यानंतर महिलेच्या लक्षात आली. महिलेने याविषयी लगेच तक्रार न करता ४ मे रोजी वेदांतनगर ठाण्यात धाव घेतली. ही घटना तुळजापूर येथे घडलेली असल्याने पोलिसांनी महिलेची फिर्याद नोंदवून घेत पुढील तपासासाठी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद