शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

औरंगाबादमध्ये कचरा पेटला; वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:26 IST

शहरात १४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फुटण्यास मार्ग नसून चारही दिशांकडील गावातील नागरिकांनी खुल्या जागेवर कचरा टाकण्यास विरोध केला. या कचराकोंडीवरून मनपा विरोधात शिमगा पेटला आहे. हर्सूल तलाव परिसर, नक्षत्रवाडी, करोडी, मिटमिटा परिसरासह शहरातील वॉर्डांमधील खुल्या जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला. मिटमिटा परिसरात गावक-यांनी कचºयाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला तर कांचनवाडी-नक्षत्रवाडीतील महिला व नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करीत आंदोलन केले.

ठळक मुद्देमिटमिट्याजवळ ट्रक पेटवला : मनपाने ५0 ट्रक कचरा जिरविला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात १४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फुटण्यास मार्ग नसून चारही दिशांकडील गावातील नागरिकांनी खुल्या जागेवर कचरा टाकण्यास विरोध केला. या कचराकोंडीवरून मनपा विरोधात शिमगा पेटला आहे. हर्सूल तलाव परिसर, नक्षत्रवाडी, करोडी, मिटमिटा परिसरासह शहरातील वॉर्डांमधील खुल्या जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला. मिटमिटा परिसरात गावकºयांनी कचºयाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला तर कांचनवाडी-नक्षत्रवाडीतील महिला व नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करीत आंदोलन केले. कचºयाचे ढीग शहरात वाढू लागले असून, नारेगाव- मांडकी येथील कचरा डेपो हटावच्या विरोधात आंदोलन करणाºया नागरिकांनी कचºयाची होळी करूनन प्रशासकीय यंत्रणेविरोधात बोंबा मारल्या.नारेगाव-मांडकीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शहराभोवतीच्या सर्व परिसरातून नागरिकांनी विनाप्रक्रियेचा कचरा टाकू देण्यास जोरदार विरोध केला. होळीच्या दिवशी कचरा प्रश्न पेटला. नागरिकांनी कांचनवाडीत कचºयाच्या गाड्या अडवून त्यावर दगडफेक केली. तेथे पोलिसांनी फौजफाट्यासह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पडेगाव परिसरात तर कचºयाचा एक ट्रक पेटवून दिल्याने तणाव निर्माण झाला. न्यायालयाच्या आदेशानंतर शहराभोवतीच्या पडेगाव-मिटमिटा, जांभूळवन, हर्सूल तलाव, हर्सूल-सावंगी टोलनाका, पर्यटनस्थळ बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी येथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पण सर्व ठिकाणी विनाप्रक्रियेचा कचरा टाकण्यास नागरिकांनी तीव्र विरोध करून पालिकेच्या गाड्या परतवून लावल्या. सकाळी नऊ वाजताच जांभळा येथे जाणाºया कचºयाच्या गाड्यांना नागरिकांनी अडविले. त्यात एमएच-२० ए-३७७४ क्रमांकाच्या ट्रकमधील कचºयाला नागरिकांनी आग लावली. तत्पूर्वी सकाळी काही गाड्या जांभळा येथे खाली करण्यात आल्या. मात्र, तो कचरा पुन्हा सदरील गाडीमध्ये भरण्यास भाग पाडून नागरिकांनी त्या परतवून लावल्या.प्रशासनाने आतापर्यंत काय केलेगेल्या १५ दिवसांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. महापौर आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतलेली आहे. परंतु उच्च न्यायालयाने नेमके काय आदेश दिले, प्रशासनाने आतापर्यंत काय केले, असा सवाल नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांना द्यावे लागले. महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरी कचराकोंडी सोडविण्यात यश मिळत नाही. कचºयाचा प्रश्न नेमका आताच का चिघळला? प्रशासन काय करते, उच्च न्यायालयाचे आदेश काय, याचा सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. राजगौरव वानखेडे म्हणाले शहराचे नाव देशात बदनाम झाले असून, नगरसेवकांचीही बदनामी होत आहे. शहर अभियंता पानझडे म्हणाले की, प्रशासन संवेदनशील असून, प्रयत्न केले जात आहेत. तीन ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी गेलो असता नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नारेगाव येथे कचरा टाकायला मान्यता मिळाल्यास डीपीआर तयार असून, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.कांचनवाडीत बळाचा वापरशहराची कचराकोंडी फोडण्यासाठी कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटच्या बाजूलाच असलेल्या १५ एकर खुल्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता गाड्या वळविण्यात आल्या. कांचनवाडीतील नागरिकांनी त्या वाहनांवर दगडफेक केली. यात पालिकेच्या पाच-सहा गाड्यांचे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच नागरिकांना समजवण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, आयुक्त डी. एम. मुगळीकर दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी विरोध करणाºया नागरिकांना सातारा पोलिसांनी अटक केली. अखेर बळाचा वापर करून कांचनवाडीत कचºयाच्या काही गाड्या रिक्त करण्यात आल्या.कांचनवाडीत संताप; तुफान दगडफेकऔरंगाबाद : शहरातील कचºयाची वाहतूक करणारा ट्रक अडवून तीन ते चार जणांनी ट्रकमधील कचरा पेटवून दिला. ही घटना मिटमिटा रोडवरील एका ढाब्याजवळ घडली. कांचनवाडी येथे कचºयाची वाहने अडविणाºयांना पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी पैठण रोडवरील दोन एस. टी. बस आणि दोन खाजगी वाहनांवर दगडफेक केली.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात मांडकी, गोपाळपूर, वरूड आणि नारेगाव येथील ग्रामस्थांनी १४ दिवसांपासून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे शहरातील सर्व कॉलन्यांमध्ये कचºयाचे ढीग साचले. त्यामुळे शहरात रोगराईला आमंत्रण मिळते आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने आज पहाटेपासून शहराच्या चार दिशांना कचरा नेऊन टाकण्यास सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मिटमिटा रोडने मनपाचे कर्मचारी ट्रकमधून कचरा नेत असताना पाच ते सहा जणांनी त्यांचा ट्रक अडविला. यातील तीन जणांनी ट्रकच्या बोनेटवर लोखंडी टॉमी मारली. तर अन्य तीन ते चार जणांनी ट्रकवर चढून त्यातील कचरा पेटवून दिला. ट्रकच्या मागून पोलीस येत असल्याचे पाहून आग लावणारे आणि ट्रकचालकास धमकावणारे दुचाकीने तेथून पसार झाले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेला कचरा विझविला. या घटनेनंतर चालकाने ट्रक छावणी ठाण्यात नेऊन उभा केला.दुसरी घटना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास कांचनवाडी येथे घडली. कांचनवाडी येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरामागे मनपाची ५० एकर जागा आहे. पोलीस बंदोबस्तात मनपाकडून तेथे कचरा नेऊन टाकण्यात येत होता. ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांनी कचरा वाहतूक करणारे ट्रक अडविले. ट्रक अडविणाºया ६९ महिला आणि २० पुरुष आंदोलकांना बंदोबस्तावरील पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी धरपकड सुरू करताच उर्वरित लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.या दगडफेकीत एस. टी. महामंडळाच्या दोन बसच्या काचा फुटल्या. तर एक मालवाहू ट्रक आणि कारवरही दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.