शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘झालर’चे अडकले नकाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:21 IST

नगरविकास खाते आणि सिडकोच्या बेफिकिरीमुळे २८ गावांसाठी तयार केलेले नकाशे सामान्य नागरिकांसाठी सात महिन्यांपासून उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. ज्या एजन्सीने नकाशे तयार केले आहेत त्या एजन्सीकडेच नकाशे पडून आहेत. ५० लाख रुपयांचे बिल एजन्सीला कुणी द्यावे, या वादात झालर क्षेत्र विकास आराखड्याचे अंतिम नकाशे अडकले आहेत.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नगरविकास खाते आणि सिडकोच्या बेफिकिरीमुळे २८ गावांसाठी तयार केलेले नकाशे सामान्य नागरिकांसाठी सात महिन्यांपासून उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. ज्या एजन्सीने नकाशे तयार केले आहेत त्या एजन्सीकडेच नकाशे पडून आहेत. ५० लाख रुपयांचे बिल एजन्सीला कुणी द्यावे, या वादात झालर क्षेत्र विकास आराखड्याचे अंतिम नकाशे अडकले आहेत.त्या नकाशांच्या आधारे ज्यांना आरक्षणाबाबत आक्षेप घ्यायचा आहे, त्यांना आक्षेप दाखल करण्यास विलंब होतो आहे. नकाशे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची, भूधारकांची परवड होत आहे. तर सातारा-देवळाई वगळून उरलेल्या २६ गावांतील शेतकरी, विकासकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सिडकोतील सूत्रांनी सांगितले, सध्या बिल अदा करण्यावरून नकाशांचे प्रकरण रखडले आहे. झालर क्षेत्र विकास आराखड्याच्या नकाशांची मूळ प्रत टाऊन प्लॅनिंगकडून सिडकोला मिळालेली नाही. ज्या एजन्सीने ते नकाशे बनविले, त्या एजन्सीला कामाचा मोबदला दिलेला नाही. २८ गावांतील सर्व्हे आणि नकाशे पुण्यातील मोनार्च या एजन्सीने तयार केले आहेत. सिडकोचा आणि त्या एजन्सीचा काहीही संबंध नाही. तरीही सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नगरविकास खात्याला पत्र दिले आहे. एजन्सीने सुमारे ५० लाख रुपयांसाठी नकाशांच्या मूळ प्रती दाबून ठेवल्या आहेत. एजन्सीची ५० लाख रुपयांची रक्कम मंत्रालयात जमा करण्यासाठी सिडकोने पत्र दिले आहे. सिडकोसोबत त्या संस्थेचा कुठलाही करार नाही. त्यामुळे सिडको ५० लाख रुपये कुठून देणार, असा प्रश्न आहे. तसेच टाऊन प्लॅनिंगने त्या एजन्सीला नियुक्ती कशी दिली, याचे कोणतेही दस्तवेज उपलब्ध नाहीत. त्यामुळे मंत्रालयात रक्कम जमा करून सिडको मूळ प्रत ताब्यात घेण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादbillबिल