शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकऱ्यांची व्होटबॅंक झाल्याशिवाय परिवर्तन अशक्य : अशोक ढवळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:19 IST

येत्या १ जून रोजी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. ती काॅर्पोरेट जगताला पूरक आहेत. हे चित्र बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जशी शेतकऱ्यांची व्होट बॅंक तयार झाल्याचे दिसून आले, तशी व्होट बॅंक आगामी निवडणुकांमध्ये दिसून आली तरच परिवर्तन शक्य होईल, असा विश्वास बुधवारी सायंकाळी पत्र परिषदेत अ. भा. किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे व कॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला.

भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी करावी, हे आश्चर्यकारक असून हे चुकीचे घडले, असे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या १ जून रोजी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. छत्रपती संभाजीनगर व पैठण येथे हे अंदोलन होईल, असे कॉ. भगवान भोजने यांनी सांगितले. ढवळे यांनी आरोप केला की, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत आहे. लाडक्या बहिणींसाठी समाजकल्याण व आदिवासी खात्याचा निधी वळवण्यात येत आहे.

कमिशन खाण्याची सोयकसेल त्याची जमीन इतक्या वर्षांनंतरही होत नाही. ६ ते ७ लाख एकर जमीन देवस्थान इनामी जमिनीची आहे. कसणाऱ्यांच्या नावावर ही जमीन झाली पाहिजे, अशी किसान सभेची मागणी आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी भूमी अधिग्रहण सुरू आहे. मुळात या शक्तिपीठाची गरजच काय, असा सवाल करून डॉ. ढवळे यांनी, ही कमिशन खाण्याची सोय असल्याचा आरोप केला. पत्रपरिषदेस विनोद निकोले, कॉ. मंगल ठोंबरे, ॲड. सचिन गंडले यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र