शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धिंगाणा ‘तिनं’ घातलाय ना...; मद्यधुंद महिलेच्या भांडणाने उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 18:18 IST

सिडकोतील उड्डाणपुलावर दारूच्या नशेतील महिला एका व्यक्तीसोबत भांडत गदारोळ करीत होती.

ठळक मुद्देपोलिसांनी महिलेस घेतले ताब्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की

औरंगाबाद : एका मद्यधुंद महिलेने एका व्यक्तीसोबत भांडण झाल्यानंतर सिडकोतील वीर सावरकर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री गोंधळ घातला. पकडण्यासाठी आलेल्या महिलापोलिसांना ती पुलावरून उडी मारून आत्महत्येची धमकी देत होती. पोलिसांनी कौशल्याने तिला ताब्यात घेतले आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. तेथेही तिने पोलिसांसोबत हुज्जत घालून आरडाओरड केली. हा प्रकार पाहून धावती वाहने थांबल्याने पुलावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.  

सिडकोतील उड्डाणपुलावर दारूच्या नशेतील महिला  एका व्यक्तीसोबत भांडत गदारोळ करीत होती. पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री सात वाजता ही माहिती कुणीतरी  कळविली. गस्तीवरील सिडको पोलीस, एमआयडीसी सिडको पोलीस आणि नंतर दामिनी पथक तेथे दाखल झाले. पोलिसांना पाहून त्या महिलेने माझ्या गळ्यातील सोन्याचे गंठण पडले, मी  उड्डाणपुलावरून उडी मारते़़, असे जोराने ओरडत एक पाय पुलाच्या कठड्यावर ठेवू लागली. मला कोणीही पकडू नका, असे ती ओरडत होती. दामिनी पथकाच्या पोलिसांनी बोलण्यात गुंतवून तिला पकडले. त्याच वेळी महिलेची मुलगी मोपेड घेऊन तेथे आली. ‘आमचा घरगुती वाद आहे, माझ्या आईला पकडू नका,’ असे ती ओरडून पोलिसांना सांगत होती. 

पोलिसांनी मुलीला एका गाडीत तर मद्यधुंद महिलेला दुसऱ्या गाडीत बसवून थेट एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. माय-लेकींनी महिला पोलिसांसोबत हुज्जत घातली. यामुळे पुलावर वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक  कोंडी झाली. 

सिडको ठाण्यातही गोंधळएमआयडीसी सिडको ठाण्यात नेल्यानंतर त्या महिलेने तेथेही आरडाओरड करीत गदारोळ केला. महिला पोलिसांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. या घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याविषयी ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :cidcoसिडकोcidco aurangabadसिडको औरंगाबादWomenमहिलाPoliceपोलिस