शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

‘ईस्टर’ सणानिमित्त पारंपरिक पद्धतीने प्रार्थना, मिरवणूक व इतर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:26 IST

‘गुड फ्रायडे’च्या बलिदानानंतर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण ‘ईस्टर’रविवारी भक्तिभावे, प्रार्थना आणि धर्मोपदेशासह पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी पवित्र शास्त्राआधारे सणाचे धार्मिक महत्त्व विशद केले. गायकवृंदांनी प्रसंगानुरूप गीते सादर करून वातावरण निर्मिती केली.

औरंगाबाद : ‘गुड फ्रायडे’च्या बलिदानानंतर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण ‘ईस्टर’रविवारी भक्तिभावे, प्रार्थना आणि धर्मोपदेशासह पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी पवित्र शास्त्राआधारे सणाचे धार्मिक महत्त्व विशद केले. गायकवृंदांनी प्रसंगानुरूप गीते सादर करून वातावरण निर्मिती केली.रविवारी पहाटे शहराच्या विविध परिसरातून पुनरुत्थानाची भजने गात, विविध वाद्य व ढोल-ताशांसह मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना भाविकांनी पाणी, चहा, फराळ, पोहे, बिस्किटे आणि आइस्क्रीम वाटप केले. सायंकाळी सर्वपंथीय ख्रिश्चन बांधवांतर्फे सलग १४ व्या वर्षी शहरातून ‘शांतता रॅली’ काढून सर्वधर्म समभाव आणि शांततेचा संदेश देण्यात आला.छावणीतील क्राईस्ट चर्च, सेंट फि लिप चर्च, होली ट्रिनीटी चर्च, सेंट स्टिफन चर्च- सिडको, सेंट पॉल चर्च- बाजार वाहेगाव, संत आंद्रिया चर्च-सायगाव, क्राईस्ट चर्च- बदनापूर , सेंट लेनार्ड चर्च- पाचोड, हर्षी आणि डोणगाव, क्राईस्ट चर्च-वाळूज, सियोन चर्च- बजाजनगर, इम्यान्युएल चर्च मिनिस्ट्रीज-लांझी, चर्च आॅफ दी नॅझरीन (सिटी)- ज्युबिली पार्क, चर्च आॅफ दी नॅझरीन -सिडको , हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्च- काचीवाडा, ए. जी. चर्च- मसनतपूर , फ्रेड प्रेअर हॉल- उस्मानपुरा, एनटीपीएच शारोन चर्च- भावसिंगपुरा, सियोन चर्च- शताब्दीनगर, न्यू लाईफ फेलोशिप चर्च, ईसीआय चर्च- मुकुंदवाडी, शारोन प्रार्थना हॉल- भावसिंगपुरा, आराधना फेलोशिप चर्च, सेंट जॉन चर्च, सीएफसी चर्च, नवजीवन धारा चर्च, डेक्कन ख्रिश्चन सेंटर, ब्रदरेन चर्च, सिलोह चर्च- बजाजनगर, बॅप्टिस्ट चर्च, सेव्हन्थडे अ‍ॅडव्हेन्टिस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च-छावणी, जालना रोड, सिडको आणि वाळूज, नवप्रेषितीय मंडळी-तुर्काबाद खराडी, सीफेम होली चर्च-उस्मानपुरा, खावडा आणि तीसगाव, स्वर्णा फेलोशिप चर्च- नारेगाव, ब्रदरहूड चर्च- समतानगर आदी चर्चमध्ये वरीलप्रमाणे ईस्टर सण साजरा करण्यात आला.मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना वाघमारे आणि घाडगे परिवारातर्फे चहा आणि खिचडी वाटप करण्यात आली. निकाळजे यांनी आइस्क्रीम, बंटी उमाप यांनी चहा आणि पोहे, ज्युएल अर्नाजलम आणि संतोष पाटोळे यांनी बिस्किटे आणि झिम्बाब्वे गँगतर्फे पोहे वाटप करण्यात आले. चर्चसमोरील विविध स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा सर्वांनी लाभ घेतला.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGood Friday 2018गुड फ्रायडे २०१८