शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दौरे पुरे झाले, प्रत्यक्ष मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:47 IST

शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

श्रीकांत पोफळे / शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

२७ आॅक्टोबर सकाळी ८ वाजता सटाणा येथे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत पीक पाहणीसाठी उपस्थित होते. उपसरपंच नारायण घावटे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव घावटे, ज्ञानेश्वर घावटे, गणेश घावटे, योगेश घावटे आदींची पालकमंत्र्यांनी भेट घेतली. औरंगाबाद तालुका दुष्काळग्रस्त असल्याने अनुदान जाहीर करून तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, सध्या चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने चारा छावणी सुरू कराव्यात, शिवाय फळबागा वाचवण्यासाठी काय करता येईल त्यादृष्टीने सुद्धा कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी केली.

तालुक्यावर भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणे आटली खरिपाचे पिके वाया गेली. या उत्पन्नातून पिकावर झालेला खर्च निघाला नाही. शिवाय खरिपाच्या पिकातून मका व बाजरी यातून चारा निघाला. मात्र हा चारा केवळ महिनाभर पुरेल. शिवाय पाणीटंचाई भीषण उग्ररुप धारण करत आहे. पालकमंत्री दिपक सावंत यांनी अनेक शिवारात जाऊन कापूस, तुर या पिकांची पाहणी केली.

यावेळी माजी आ. डॉ. कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, प.स.सभापती ताराबाई उकीर्डे, एस.डी.एम ज्ञानोबा बाणापुरे, तहसिलदार सतिष सोनी, कैलास उकर्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक शिंदे, विठ्ठल कोरडे, डॉ.भगवान शिंदे, संपत वाघ आदिंची उपस्थिती होती, शिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी सुद्धा सकाळी दोन गावांत उपस्थित होते.पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणारआपण शेतकाºयांच्या बाजूने असून, बांधावर जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणे मांडणार आहे. पाहणी अहवाल सादर केल्यानंतर मदत जाहीर होईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद