शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो हे लक्षात असू द्या; २२ ते २४ जानेवारीला अजिंठ्यातील दोन लेण्या बंद असतील

By योगेश पायघन | Updated: January 21, 2023 16:05 IST

दोन्ही लेण्यात चित्र संवर्धनासाठी ‘फ्युमिगेशन’ करण्यात येणार

औरंगाबाद : अजिंठा लेणीत चित्रांचे संवर्धन करण्यासाठी लेणी क्रमांक १६ आणि १७ मध्ये ‘फ्युमिगेशन’ करण्यात येणार आहे. त्यामुळे या लेण्या पर्यटकांसाठी २२, २३, २४ जानेवारी रोजी बंद असतील. २५ जानेवारीपासून या लेण्या पर्यटकांना पाहता येतील.

किडे, सूक्ष्म जिवांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येतात. अजिंठा शाखेच्या रसायनशास्त्र शाखेतर्फे २२ ते २४ जानेवारीदरम्यान लेणी क्रमांक १६ आणि १७ मध्ये इफाॅक्साईड वायू सोडण्यात येणार आहे. फ्युमिगेशननंतर ३६ तास लेणी हवाबंद ठेवावी लागते. त्यामुळे या तीन दिवसांत पर्यटकांना या लेण्या बघता येणार नाहीत. हे काम उपअधीक्षक डाॅ. एस. विनोद कुमार, अखिलेश भदोरिया, अनुपमा महाजन, नीलेश महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १ आणि २ क्रमांकाच्या लेणीचे काम करण्यात आले होते.

काय आहे लेणी क्र.१६ आणि क्र. १७ मध्येलेणी क्र.१६या लेणीत गौतम बुद्धाच्या जीवनातील घटना येथे दाखविण्यात आल्या आहेत. येथील कथकली नृत्याची चित्रे उल्लेखनीय आहेत. आतमध्ये बुद्धांची भव्य मूर्ती आहे. तसेच परलम्बापर मुद्रा, हत्ती, घोडे, मगर यांचीही चित्रे येथे कोरलेली आहेत. छतावरही सुंदर चित्रकला आढळते.

लेणी क्र. १७या लेणीत देखील बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत. आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेणीत आहे. पूर्वजन्मी बुद्ध अनेक सोंडांचा हत्ती असल्याचे चित्रही येथे दिसते. येथील छतावर परीकथा चित्रित केल्या आहेत.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद