शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:29 IST

महिलेला विवस्त्र करून मारहाण : १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सिल्लोड : सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमधील घर व दुकानाच्या वादावरून रविवारी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी महिलेला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ९ जणांविरुद्ध तर एकाचे दात पाडल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध अशा एकूण १५ जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.मंगलाबाई सीताराम बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमची जागा हडपण्यासाठी आमच्या विरुद्ध न्यायालयात खोटे दावे दाखल करून आमच्या दुकानात व घरात बेकायदा घुसून अंगावरील कपडे फाडून विवस्त्र करून मला बेदम मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रामदास विठ्ठल वाघ, मुरलीधर विठ्ठल वाघ, धनंजय रामदास वाघ, बाबूराव विठ्ठल वाघ, गयाबाई बाबूराव वाघ, शशिकांत मुरलीधर वाघ, सोनाली धनंजय वाघ, सीमा संतोष वाघ, संगीताबाई रामदास वाघ (सर्व रा. सिल्लोड) या ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तसेच हक्काच्या जागेवर दुकानात घुसून मारहाण करून मुरलीधर वाघ यांचे दात पाडल्याप्रकरणी पोलिसांनी धनंजय रामदास वाघ (रा. सिल्लोड) यांच्या फिर्यादीवरून मनकर्णाबाई देविदास वाघ, मंगलाबाई सीताराम बोराडे, राहुल सीताराम बोराडे, किशोर सीताराम बोराडे, अमोल सीताराम बोराडे (रा. सिल्लोड) व मीनाबाई तुकाराम हरणे (रा. औरंगाबाद) या सहा जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी