शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

रस्त्यावरील टपऱ्यांवर जीभेचे लाड, पण पाणी कोणते पिताय? आरोग्याचे काय?

By साहेबराव हिवराळे | Updated: July 11, 2024 19:17 IST

विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यांवरील टपऱ्यांवर आरोग्याच्या बाबतीत किती काळजी घेतली जाते? अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे नियंत्रण टाळण्यावर जास्त भर दिला जात आहे. तुम्ही पोट भरण्याच्या कालावधीत काही गोष्टींकडे कानाडोळा करतात अन् पोटदुखी अन् ॲसिडीटीचे प्रकार समोर येतात त्यामुळे नागरिकांना डोकेदुखी, मळमळ उलट्यांचा त्रासही सहन करावा लागतो. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थावर उड्या पडलेल्या दिसतात ते अन् उघड्यावर असते, वापरलेले तेल पुन्हा वापरात घेतले जाते. अशा अनेक घटना घडतात त्याचा परिणाम मात्र आरोग्यावर होतो.

या ठिकाणी विक्रीसिडको कॅनॉट, सिडको, हडको, रेल्वे स्टेशन , शहागंज, सातारा- देवळाई , शिवाजीनगर, छावणी, चिकलठाणा, वाळूज,शेंद्रा आदीसह विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत. परंतु अनेकांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना हुलकावणी देत काही नोंद नाही आणि भरमसाट व्यवसायावर भर दिलेला दिसतो आहे.

पाणी किती स्वच्छ?शहरात पाणी पुरवठ्याचे तीन तेरा झाले असून, व्यावसायिक खाऊच्या दुकानावर नळाचे पाणी असेलच अशी व्यवस्था टाळली जाते. प्लास्टिकचा जार ठेवला जातो. तो जार शुद्ध की अशुद्ध पाण्याचा आरोग्य बिघडण्यासाठीचा आहे हे फक्त नशीबच ठरते.

नाष्टा किती आरोग्यदायीऔद्योगिक क्षेत्रात मिळणारा नाष्टा किती आरोग्यदायी आहे असे सांगता येत नाही, कामावर थकलेेला व्यक्ती नाष्टा मिळेल तो खातो आणि दिवसभर कष्ट करतो अचानक बाहेरचे खाण्यात आल्याने पोट बिघडले असे म्हणून दवाखाने गाठताना दिसतात.

पाणीपुरीत कोणते पाणी...पाणीपुरी अगदी आवडीने आपण लेकरा बाळासह खातो परंतु त्यात वापरणारे मसाले पाणी आरोग्यदायीच कशावरून त्यांचीही तपासणी होताना दिसत नाही.

ना परवाना, ना कुठली तपासणीगर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारून कमाई केली जाते परंतु आरोग्यदायी पदार्थ खाण्यास मिळत नाही.त्यांच्याकडे परवाना देखील कुठे दिसत नाही,

सहा महिन्यांत किती टपऱ्यांवर कारवाई?सहा महिन्यांत काही आस्थापनाला भेटी देऊन त्यांची खाद्यपदार्थाची तपासणी केलेली आहे. परंतु टपऱ्या मात्र मोकाट सोडलेल्या आहे. त्याकडे का लक्ष दिले जात नाही. असा प्रश्न उठतो तेव्हा पाणीपुरी, स्टॉल तपासणीची मोहीम हाती घेतलेली असून, लवकर कारवाई होणार आहे.- निखिल कुलकर्णी,निरीक्षक अन्न व औषध प्रशासन

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागAurangabadऔरंगाबादfoodअन्न