शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
4
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
5
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
6
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
7
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
8
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
9
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
10
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
11
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
12
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
13
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
14
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
15
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
16
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
17
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
18
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
19
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
20
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चौंढीचा नाका होणार ‘टोलमुक्त’

By admin | Updated: June 12, 2014 00:28 IST

कुरूंदा : वसमत - औंढा महामार्गावरील चौंढी कल्याण टोलनाका २००३ पासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत येणारे ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळात केली आहे.

कुरूंदा : वसमत - औंढा महामार्गावरील चौंढी कल्याण टोलनाका २००३ पासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत येणारे ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळात केली आहे. त्यात चौंढी कल्याण टोलनाक्याचा समावेश असून सध्या हा टोलनाका बंद करण्याचे कोणतेच आदेश आलेले नाहीत; मात्र पुणे येथील एका पथकाकडून टोलसंदर्भात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होण्याची शक्यता आहे.
वसमत फाटा ते वाघी फाटा दरम्यानच्या २० कि.मी अंतरासाठी आंबाचौंढी गावाजवळ ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर मध्य प्रदेशातील एका कंत्राटदाराला २००२ मध्ये टोलनाका देण्यात आला. या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी ५५० लाख रूपये खर्च केले होते. २०१७ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली करण्यात येणार होती. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय विधीमंडळात सोमवारी घेतला. त्यामुळे हा टोलनाका कायमचा बंद होणार असला तरी सध्या हा टोलनाका सुरू आहे. अद्याप कोणताच लेखी आदेश व पत्र टोलनाका बंद करण्यासाठी आले नसल्याचे व्यवस्थापक त्रिपाठी यांनी सांगितले.
दरम्यान चौंढी कल्याण टोलनाक्याचे सर्वेक्षण पुणे येथील एका पथकाकडून सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नेमकी किती आवक या नाक्यावर होते, त्याचे सर्वेक्षण केले जात आहे. (वार्ताहर)