जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जालन नगर पालिकेकडून १३ हजार शौचालय बांधकामचे उद्दिष्ट आहे. मात्र ३१ मार्च अखेर साडेचार हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली आहे. दरम्यान, एप्रिल अखेर शौचालये पूर्ण करण्याची शासनाने तारीख वाढवून दिली असली ती पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जालना शहरात १३ हजार वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. गत तीन ते चार महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांच्या उदासिन धोरणामुळे अनेक कामे अद्यापही रखडलेली आहेत. साडेचार हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी पालिकेकडून सुमारे पाच कोटींचा निधीही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. नगर पालिकेकडून शौचालय बांधकामासाठी विशेष पथके स्थापन करून शौचालयांची आढावा तसेच पाहणी केली. नागरिकांना मार्गदर्शन केले मात्र काही नागरिकांना केवळ निधी लाटण्यासाठी शौचालयांची कामे पूर्ण केली नाहीत. तारीख वाढवून दिली असली तरी कामे पूर्ण होणार का असा प्रश्न कायम आहे. नगर पालिकेत विशेष कक्ष स्थापन करून शौचालय कामांची माहिती संकलित करण्यात येत आहे. एकूणच नागरिकांची उदासिनता आणि पालिकेतील काही कर्मचाऱ्यांमुळे हे उद्दिष्ट अपूर्ण राहते की काय याची भीती आहे. लाभार्थींना तीन टप्प्यात अनुदान मिळणार होते. खड्डे तयार करणे, काही बांधकाम व तिसरे वापर सुरू झाल्यानंतर निधी मिळणार होता. हा निधी थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. सर्व असूनही ३१ मार्च अखेरही शौचालयांची कामे पूर्ण झाली नाहीत.
शौचालय उद्दिष्टपूर्ती झालीच नाही
By admin | Updated: April 1, 2017 00:25 IST